मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबी संघाने मुंबईला 200 धावांचं लक्ष्य दिलं आहे. आरसीबीकडून फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर हा स्कोर उभा केला होता. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाची सुरूवात झकास झाली होती. सलामीवर इशान किशन आणि रोहित शर्मा सुरूवातीला आले होते.
यामध्ये इशान याने पहिल्या चेंडूपासूनच आरसीबीच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं होतं. एकाही बॉलरला त्याने सोडलं नाही, सर्वांनाच त्याने आपल्या पट्टीत घेतलं होतं. मोहम्मद सिराज आणि हे जोश हेजलवुड यांनाही त्याने फोडून काढलं. इतकंच नाहीतर इशांतने आपल्या 42 धावांच्या खेळीमध्ये हेजलवुडला 102 मीटरचा सिक्स मारला आहे. इशान किशन याने आपल्या खेळीत 200 च्या स्ट्राईक रेटने 21 चेंडूत 42 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले.
Wait for that 102m SIX! ?
Ishan Kishan was looking promising. #MIvsRCB #IshanKishan #IPL2023 #Cricket pic.twitter.com/ub8GKWXR7A
— OneCricket (@OneCricketApp) May 9, 2023
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाला 200 धावांचं लक्ष्य दिलं आहे. आरसीबीकडून फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर हा स्कोर उभा केला होता. फाफने 60 धावा तर मॅक्सवेलने 68 धावा केल्या आहेत. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फ याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड