मुंबई : आयपीएल 2023 प्लेऑफच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असलेला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी जमेची बाजू आहे. मुंबई इंडियन्सला आयपीएल प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचा आहे. हा सामना मुंबईला नेटरनरेटच्या आधारावर जिंकावा लागेल. कारण दुपारी मुंबईचा सामना पार पडला की संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना आहे. त्यामुळे त्या सामन्यावर प्लेऑफच्या आशा असणार आहेत. दुसरीकडे हैदराबाद स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरेल.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सामना गमवल्याने मुंबई इंडियन्सला झटका लागला आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्याकडे प्रत्येकी 14 गुण आहेत. त्यामुळे या सामन्यातील पराभव प्लेऑफच्या आशा संपुष्टात आणेल. पण आरसीबीनेही सामना गमावला तर मात्र प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी असणार आहे.
मुंबई इंडियन्स: इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, विष्णु विनोद, कॅमरुन ग्रीन, टिम डेविड, क्रिस जॉर्डन, ऋतिक शौकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ
सनराइजर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, भुवनेश्वर कुमार, मयंक डागर, नीतीश रेड्डी, कार्तिक त्यागी, एन नटराजन
सनरायझर्स हैदराबाद टीम | एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी, टी नटराजन, मयंक मार्कंडे, विव्रत शर्मा, मयंक अग्रवाल, सनवीर सिंग, अकेल होसेन, मार्को जानसेन, फजलहक फारुकी, आदिल रशीद, अनमोलप्रीत सिंग, उमरान मलिक, उपेंद्र यादव आणि समर्थ व्यास.
मुंबई इंडियन्स टीम | संघ रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, कुमार कार्तिकेय, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, राघव गोयल, अर्शद खान, डेवाल्ड ब्रेविस, अर्जुन तेंडुलकर, रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, टिळक वर्मा, डुआन जॅनसेन आणि संदीप वॉरियर.