मुंबई |आयपीएल 16 व्या मोसमात आतापर्यंत क्रिकेट चाहत्यांना रंगतदार सामने आणि चढाओढ पाहायला मिळाली आहे. आता या हंगामात रविवारी 21 मे रोजी डबल हेडर खेळवण्यात येणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. मुंबई आणि हैदराबाद दोन्ही संघांचा हा या हंगामातील साखळी फेरीतील अखेरचा सामना असणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
हैदराबादचं या हंगामातील आव्हान संपु्ष्टात आलं आहे. तर मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे. या सामन्यानिमित्ताने आपण या दोन्ही संघांपैकी वरचढ कोण आहे, कुणाचे आकडे सरस आहेत, हे जाणून घेऊयात.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 20 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचा बोलबाला राहिला आहे. मुंबईने 20 पैकी 11 मॅचमध्ये हैदराबादला चितपट केलंय. तर सनरायजर्सने 9 वेळा विजय मिळवला आहे. आकड्यांच्या हिशोबाने मुंबई वरचढ आहे. मात्र हा सामना मुंबईसाठी प्लेऑफच्या हिशोबाने महत्वाचा आहे. तर हैदराबाद बाहेर पडली आहे. त्यामुळे मुंबईला हैदराबाद विरुद्ध ताकदीसह उतरायला लागणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद टीम | एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी, टी नटराजन, मयंक मार्कंडे, विव्रत शर्मा, मयंक अग्रवाल, सनवीर सिंग, अकेल होसेन, मार्को जानसेन, फजलहक फारुकी, आदिल रशीद, अनमोलप्रीत सिंग, उमरान मलिक, उपेंद्र यादव आणि समर्थ व्यास.
मुंबई इंडियन्स टीम | संघ रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, कुमार कार्तिकेय, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, राघव गोयल, अर्शद खान, डेवाल्ड ब्रेविस, अर्जुन तेंडुलकर, रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, टिळक वर्मा, डुआन जॅनसेन आणि संदीप वॉरियर.