Cameron Green Century | पहिला सिजन पहिलं शतक, कॅमरुन ग्रीनने ठोकलं हैदराबादला पण वेदना आरसीबीला

| Updated on: May 22, 2023 | 2:51 AM

मुंबई इंडियन्ससाठी कॅमरुन ग्रीन याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध शतकी खेळी करत विजयी भूमिका निभावली. ग्रीनने हैदराबाद विरुद्ध शतक करत मोठा विक्रम केला आहे.

Cameron Green Century | पहिला सिजन पहिलं शतक, कॅमरुन ग्रीनने ठोकलं हैदराबादला पण वेदना आरसीबीला
Follow us on

मुंबई | मुंबई इंडियन्ससाठी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धचा साखळी फेरीतील सामना हा ‘करो या मरो’ असा होता. मुंबईला प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजयी व्हायचं होतं. त्यामुळे मुंबईने जोरदार सराव केला होता. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या कॅमरुन ग्रीन याने धमाकेदार शतक ठोकलं. ग्रीनने शतकच ठोकलं नाही, तर मुंबईलाही अटीतटीच्या सामन्यात जिंकून दिलं. ग्रीनेने 18 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर एकेरी धाव घेत शतक साजरं केलं, यासह मुंबईचाही विजय झाला.

ग्रीनने मुंबईच्या विजयात मोठी भूमिका निभावली. सनरायजर्स हैदराबादने दिलेले 201 धावाचं आव्हान ग्रीनच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात 18 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ग्रीनचं हे आयपीएलमधील पहिलंच वर्ष होतं. ग्रीनने या मोसमातील टीमच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विजयी भूमिका बजावली.

ग्रीनने फक्त शतकच ठोकलं नाही, तर रेकॉर्डही केला आहे. ग्रीन या मोसमात शतक ठोकणारा एकूण नववा आणि सूर्यकुमार यादव याच्यानंतर दुसरा फलंदाज ठरला आहे. ग्रीनने या हंगामात वेगवान शतक ठोकण्याचा रेकॉर्ड केला आहे. ग्रीनने अवघ्या 47 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 8 फोरसह हे शतक पूर्ण केलं. याआधी या 16 व्या मोसमात वेगवान शतकाचा विक्रम हा मुंबईच्याच सूर्यकुमार यादव याच्या नावावर होता. सूर्याने गुजरात टायटन्स विरुद्ध 12 मे रोजी सिक्स ठोकत 49 बॉलमध्ये शतक केलं होतं.

पलटणचा शतकवीर

IPL 2023 मधील शतकवीर

आयपीएल 2023 मोसमातील पहिलंवहिलं शतक हे सनरायजर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूक याने शतक केलं होतं. त्यानंतर अनुक्रमे वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, प्रभसिमरन सिंह, शुबमन गिल, विराट कोहली आणि हेनरिच क्लासेन आणि कॅमरुन ग्रीन याने शतक ठोकलं आहे.

हैदराबादला ठोकलं आरसीबीला दुखलं

ग्रीनने हैदराबादच्या गोलंदाजांना ठोक ठोक ठोकलं. ग्रीनने वानखेडे स्टेडयिममध्ये चौफेर फटकेबाजी केली. मात्र याचं वाईट वाटलं ते आरसीबीला. त्याचं कारण म्हणजे मुंबईचा पराभव झाला असता तर त्याचा फायदा हा आरसीबीला झाला असता. मात्र ग्रीनने तसं होऊ दिलं नाही.

प्लेऑफच्या हिशोबाने एका जागेसाठी आरसीबी आणि मुंबईसाठी हा सामना निर्णायक होता. त्यामुळे आरसीबी मुंबईच्या पराभवासाठी पार्थना करत होती. पण तसं झालं नाही. त्यामुळे ग्रीनच्या शतकाचं आणि फटेबाजीचं हैदराबादपेक्षा आरसीबीलाच वाईट वाटलं असेल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मधवाल.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कर्णधार), मयंक अग्रवाल, विव्रत शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.