IPL 2023 : महेंद्रसिंग धोनी याच्या रिटायरमेंटची तारीख अखेर समोर आलीच, सीएसकेच्या गोटात खळबळ!

| Updated on: May 11, 2023 | 8:43 PM

MS Dhoni retirement : सीएसकेच्या चाहत्यांना प्ले ऑफपेक्षा सर्वांना माहीची ही IPL शेवटची तर नाही ना? याचं टेन्शन सर्वात जास्त आहे. धोनीच्या चाहत्यांनाच नाहीतर क्रिकेटविश्वालासुद्धा हा प्रश्न आहे. अशातच यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.

IPL 2023 : महेंद्रसिंग धोनी याच्या रिटायरमेंटची तारीख अखेर समोर आलीच, सीएसकेच्या गोटात खळबळ!
Mahendra SIngh Dhoni
Follow us on

मुंबई : आयपीएलमध्ये यंदाचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात असून अद्यापही प्ले ऑफचे चार संघ अद्याप फिक्स झाले नाहीत. पॉइंट टेबलमध्ये प्रत्येक सामन्यानंतर उलटफेर होताना दिसत आहेत. आता गुजरात टायटन्स टॉपला असून दुसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्ज आहे. मात्र सीएसकेच्या चाहत्यांना प्ले ऑफपेक्षा सर्वांना माहीची ही IPL शेवटची तर नाही ना? याचं टेन्शन सर्वात जास्त आहे. धोनीच्या चाहत्यांनाच नाहीतर क्रिकेटविश्वालासुद्धा हा प्रश्न आहे. अशातच यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल निवृत्तीबाबत माजी खेळाडू सुरेश रैनाने मोठं वक्तव्य केलं आहे. नुकतंच माझं माहीभाईसोबत बोलणं झालं आहे. त्यावेळी सीएसकेला एक ट्रॉफी मिळवून दिल्यानंतर एक हंगाम खेळणार आहे, असं धोनीने रैनाला सांगितल्याचं त्याने सांगितलं.

एमएस धोनीने अद्याप निवृत्तीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. आज नाही तर उद्या ही वेळ येणार हे आपल्याला माहीत आहे, पण त्याला आपली जबाबदारी इतरांपेक्षा चांगली समजते. सीएसकेचा पुढचा कर्णधार निवडण्याची जबाबदारीही त्याच्यावर आहे. सध्या आमच्याकडे यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसल्यांचं सीएसकेच्या अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.

सुरेश रैनाच्या म्हणण्यानुसार धोनी एक ट्रॉफी जिंकून देत एक हंगाम खेळून निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सीएसकेने यंदा ट्रॉफी जिंकली तर 2024 हे धोनीची शेवटची आयपीएल असू शकते. मात्र हे सर्व काही जर तर यावर अवलंबून आहे. स्वत: धोनी काय करतो हे कोणालाही माहित नाही. धोनीने कसोटीमधूनही तडकाफडकी निवृत्ती घेतली होती.

दरम्यान, सीएसकेचा संघ आता पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. प्ले ऑफ मधील स्थान तर सीएसके संघाने जवळपास निश्चित केलं आहे.