MI in Playoff : मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री मारताच फ्रेंचाईसीने केलं भन्नाट ट्वीट, म्हणाले…

| Updated on: May 22, 2023 | 12:54 AM

आयपीएल 2023 स्पर्धेत बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गुजरातने आरसीबीला पराभवाचं पाणी पाजलं. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये वर्णी लागली आहे. यानंतर फ्रेंचाईसीने भन्नाट ट्वीट केलं आहे.

MI in Playoff : मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री मारताच फ्रेंचाईसीने केलं भन्नाट ट्वीट, म्हणाले...
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफचं गणित स्पष्ट झालं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गुजरात टायटन्सने 6 गडी आणि 5 चेंडू राखून पराभूत केलं. या पराभवासह आरसीबीचा स्पर्धेतील पत्ता कट झाला आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या चार संघांनी प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये एन्ट्री केल्याने सहाव्यांदा चषकावर ना कोरण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्सची आश्चर्यकारकपणे प्लेऑफमध्ये एन्ट्री होताच फ्रेंचाईसीने भन्नाट ट्वीट केलं आहे. इतकंच काय मुंबईच्या खेळाडूंना सुपर हिरोंच्या व्यक्तिरेखेत दाखवण्यात आलं आहे.

सुपरहिरोज. जादूगार. राक्षस. तुम्ही त्यांना अ‍ॅव्हेंजर्स म्हणता, आम्ही त्यांना मुंबई इंडियन्स म्हणतो.”, असं ट्वीट मुंबई इंडियन्सने क्वालिफाय झाल्यानंतर केलं आहे. मुंबई इंडियन्स क्वालिफाय झाल्याने आता जेतेपदाच्या आशा वाढल्या आहेत.

मुंबई इंडियन्सने 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळत 16 गुणांसह प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमधील सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. आतापर्यंत झालेल्या साखळी फेरीतीली एका सामन्यात लखनऊने मुंबईला पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे हा सामना अतितटीचा होणार आहे.

मुंबई आणि लखनऊचा संपूर्ण स्क्वॉड

मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

लखनऊचा पूर्ण स्क्वॉड : केएल राहुल, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, कृणाल पंड्या, कायल मायर्स, मार्कस स्टोयनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, जयदेव उनादकट, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सैम्स, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, नवीन उल हक, युद्धवीर सिंह.