मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 22 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलंय. या डबल हेडरमधील पहिला सामना हा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत सलग 2 सामन्यातील पराभवानंतर विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. तर पंजाब किंग्सने 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवलाय. तर तेवढ्याच सामन्यात पराभवही झालाय. त्यामुळे एका सामन्याचा अपवाद वगळला तर दोन्ही संघाची स्थिती सारखीच आहे. मुंबई पंजाबवर मात करुन विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पंजाबसमोर मुंबईची ही घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे. या सामन्यानिमित्ताने आपण सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना हा 22 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलंय.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
क्रिकेट चाहत्यांना मोबाईल आणि लॅपटॉपवर मुंबई विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.
पंजाब किंग्स टीम | शिखर धवन (कॅप्टन) सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत सिंग भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग, राहुल चहर, सिकंदर रझा, कागिसो रबाडा, ऋषी धवन, मोहित राठी, शिवम सिंग, भानुका राजपक्षे, बलतेज सिंग, विद्वत कवेरप्पा आणि गुरनूर ब्रार.