मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या हंगामात एकूण 5 सामन्यांचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं. या 5 सामन्यात काही खेळाडूंना दुखापत झाली. तर काहींनी पहिल्याच सामन्यात आपली छाप सोडली. मात्र या पलीकडे क्रिकेट चाहत्यांवर भोजपुरी भाषेतील कमेंट्रीने मोहिनी घातली आहे. या भोजपुरी भाषेतील विनोदी गोडव्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी या कमेंट्रीला डोक्यावर घेतलं आहे. सोशल मीडियावर सर्वत्र या भोजपुरी कमेंट्रीची हवा पाहायला मिळतेय. आयपीएल 2023 मध्ये यंदापासून जिओ सिनेमावर एकूण 12 भाषांमध्ये कमेंट्री ऐकता येणार आहे. या 12 भाषेंच्या तुलनेत भोजपुरी भाषेतील कमेंट्री क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे.
आयपीएल 2023 मध्ये भोजपुरी भाषेत एकूण 6 जण कमेंट्री करत आहेत. यापैकी अभिनेता आणि खासदार रवी किशन हा भोजपुरी कमेंट्री करतोय. भोजपुरी भाषा आणि त्याला असलेला देसी तडका यामुळे ही कमेंट्री आणखी रंगतदार होतेय.
भोजपुरी एक्टर रवी किशन याच्या कमेंट्रीत असेलेल काही ठराविक शब्दांची चर्चा आहे. “ई का हो, मुंह फोडबा का?” असे डायलॉग ऐकायला मिळाले. तर कधी ‘सट्ट से अंदर घुस गइल’, “जियs जवान जियs…लही गईल-लही गईल” आणि “अउर हई देखबा”, हे आणि असे विविध डॉयलॉग भोजपुरी कमेंट्रीमध्ये ऐकायला मिळत आहेत.
आयपीएल भोजपुरी कमेंट्री
Ravi Kishan doing bhojpuri commentary in the IPL 2023 on Jio Cinema – So good to hear the bhojpuri commentary! pic.twitter.com/koj1pcRkrY
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 1, 2023
रवी किशन याने भोजपुरी कमेंट्री केल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला. रवी किशनने या व्हीडिओत आपल्या मातृभाषेत (भोजपुरी) कमेंट्री करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबाबत जिओ सिनेमाचे आभार मानले.
रवी किशनने या पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच “जिंदगी झंड बा और पहली बार हुए #iplbhojpuri का घमांड बा !!!! तसेच तुम्ही सर्वांनी मला आणि भोजपुरी भाषेला इतका सन्मान दिलात. यासाठी मी आपल्या सर्वांचा आभारी आहे”, असं रवी किशनने या पोस्टमध्ये म्हटलंय.
भोजपुरी कमेंट्री करणारे कॉमेंटेटर
रवी किशन, मोहम्मद सैफ, शिवम सिंह, सत्य प्रकाश, गुलाम हुसैन आणि सौरभ वर्मा.