मुंबई | मुंबई इंडियन्स टीमने गुजरात टायटन्स टीमवर 27 धावांनी विजय मिळवला. मुंबईने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाउल पुढं टाकलंय. तर गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी आणखी प्रतिक्षा पाहण्यास भाग पाडलंय. इतकंच नाही, मुंबईने गुजरातवर मात करत गेल्या सामन्यातील पराभवाचा वचपाही घेतला. मुंबईने गुजरातला विजयासाठी सूर्यकुमार यादव याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 219 धावांचं आव्हान दिलं. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 218 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 49 बॉलमध्ये
6 सिक्स आणि 11 चौकारांसह नॉट आऊट 103 धावा केल्या. तर राशिद खान याने मुंबईच्या 4 फलंदाजांना आऊट केलं.
त्यानंतर 219 धावांचं पाठलाग करायला आलेल्या गुजरातला मुंबईच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने धक्के दिले. त्यामुळे गुजरातची 13.2 ओव्हरमध्ये 8 बाद 103 अशी स्थिती झाली. त्यामुळे मुंबईचा विजय सोपा झाला असं वाटत होतं. मुंबईला मोठ्या फरकासह विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्यील नेट रन रेट सुधारण्याची संधी होती. मात्र राशिद खानने मुंबईच्या गोलंदाजांना सपशेल रडवलं.
राशिद खान याने अल्जारी जोसेफ याच्या मदतीने नवव्या विकेटसाठी नाबाद 88 धावांची नाबाद भागीदारी केली. राशिदला गुजरातला विजयी करता आलं नाही, मात्र त्याने पराभवातील धावांचा फरक कमी केला, ज्यामुळे मुंबईला विजयानंतर विशेष फायदा होऊ शकला नाही. राशिदने बॉलिंगसह धमाका केल्यानंतर बॅटिंगने विस्फोटक खेळी केली.
राशिदने 32 बॉलमध्ये नाबाद 79 धावांची खेळी केली. राशिद या सामन्यात गुजरातकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. राशिद याच्या या खेळीच्या जोरावर गुजरातला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 191 धावाच करता आल्या. या सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, हे आपण जाणून घेऊयात.
सूर्यकुमार यादव याने नॉट आऊट 103 धावांच्या शतकी खेळीसह ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीतील पहिल्या 5 फलंदाजांच्या यादीत धडक मारली आहे. ऑरेन्ज कॅप फाफ डु प्लेसिस याच्याकडे कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर यशस्वी जयस्वाल आहे. मात्र सूर्याने थेट तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. यामुळे गुजरात टायटन्सच्या शुबमन गिल याची चौथ्या, तर सीएसके च्या डेव्हॉन कॉनवे याची चौथ्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर घसरण झालीय. तर विराट कोहली पहिल्या 5 फलंदाजांमधून बाहेर पडलाय. विराट सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
राशिद खान याने मुंबई विरुद्ध 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने युझवेंद्र चहल याला मागे टाकत पर्पल कॅप पटकावली. राशिदच्या नावावर आता एकूण 23 विकेट्सची नोंद झाली आहे. राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहल याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 4 विकेट्स घेत ही कॅप मिळवली होती. मात्र ती कॅप एक दिवसापेक्षा फार काळ कायम राखण्यात यश आलं नाही.
राशिदने पछाडल्यानं युझवेंद्र दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. चहलची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाल्याने त्याचा फटका मोहम्मद शमी याला बसला. शमी दुसऱ्यावरुन चौथ्या क्रमांकावर आला. तसेच पीयूष चावला याने गुजरातच्या 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे पीयूष पाचव्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर तुषार देशपांडे चौथ्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि कुमार कार्तिकेय.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि नूर अहमद.