मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 13 मे रोजी 2 सामने पार पडले. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला 31 धावांनी पराभूत केलं. या 2 सामन्यांमध्ये गोलंदाजांची धुलाई पाहायला मिळाली. विजयी धावांचा पाठलाग करताना लखनऊकडून मार्क्स स्टोयनिस, प्रेरक मंकड आणि निकोलस पूरन या तिकडीने विस्फोटक खेळी केली. तर पंजाबच्या प्रभासिमरन सिंह याने दिल्ली विरुद्ध शतक ठोकलं.
पहिल्या सामन्यात लखनऊ आणि दुसऱ्या मॅचमध्ये पंजाब या दोन्ही संघांनी विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. या दोन्ही सामन्यांनंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या पहिल्या 5 खेळाडूंमध्ये बदल झालाय का, हे आपण पाहणार आहोत.
या डबल हेडरनंतरही शनिवारी ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमधील पहिले 5 खेळाडू आपल्या ठिकाणी कायम आहेत. त्यामुळे फाफ डु प्लेसीस याच्याकडे ऑरेन्ज आणि राशिद खान याच्याकडे पर्पल कॅप कायम आहे. मात्र रविवारी 14 मे रोजी होणाऱ्या डबल हेडरनंतर यामध्ये नक्कीच बदल होणार आहे. कारण रविवारी मोठ्या संघांमध्ये कडवी टक्कर होणार आहे.
ऑरेन्ज कॅप कुणाकडे?
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
रविवारी आयपीएल 16 व्या मोसमात पहिला सामना हा आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत.
पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
ऑरेन्ज कॅपमधील पहिल्या 5 फंलदाजांमध्ये आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस, राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल आणि सीएसकेचा डेव्हॉन कॉनवे यांचा समावेश आहे. तर पर्पल कॅपच्या लढतीत असलेल्या पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आणि चेन्नई सुपर किंग्सचा तुषार देशपांडे आहे. या टीम रविवारी खेळणार आहेत.
त्यामुळे निश्चितच पर्पल आणि ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत बदल होणं अपेक्षित आहे. यामुळे रविवारी नक्की काय होतं, कोण उलटफेर करतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद आणि मुकेश कुमार.