अहमदाबाद | गुजरात टायटन्स टीमने सनरायजर्स हैदराबाद संघावर 34 धावांनी शानदार विजय मिळवला. गुजरातने हैदराबादसमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 154 धावाच करता आल्या. हैदराबादची विजयी धावांचं पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. हैदराबादने झटपट विकेट्स गमावल्या. त्यामुळे हैदराबादची 9 ओव्हरमध्ये 7 बाद 59 अशी स्थिती झाली. त्यामुळे गुजरातला मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची संधी होती. मात्र हेनरिच क्लासेन याने 44 बॉलमध्ये सर्वाधिक 64 धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमार याने 27 आणि मयांक मार्कंडे याने नाबाद 18 धावंची खेळी केली. तर कॅप्टन एडन मार्करम 10 धावा करुन मैदानाबाहेर परतला. या चौकडीने केलेल्या कामगिरीमुळे हैदराबादच्या पराभवातील धावांचं अंतर कमी झालं.
हैदराबादकडून या चौकडीचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. हैदराबादकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा या दोघांनी सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर यश दयाल याने 1 विकेट घेतली.
त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातच्या चौघांना भोपळा फोडता आला नाही. चौघांना दुहेरी धावा करण्यापासून हैदराबादने रोखलं. मोहित शर्मा शून्यावर नाबाद राहिला. तर शुबमन गिल याने सर्वाधिक 101 धावांची शतकी खेळी केली. तर साई सुदर्शन याने 47 धावांचं योगदान दिलं.
शुबमन आणि साई या दोघांनी केल्या खेळीमुळे गुजरातला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 188 धावा करता आल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर मार्को जान्सेन, फझलहक फारूकी आणि टी नटराजन या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
गुजरात टायटन्स या विजयासह प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. तर हैदराबादचा या मोसमातून बाजार उठला. दिल्ली कॅपिट्ल्सनंतर सनरायजर्स हैदराबाद या सिजनमधून बाहेर पडणारी दुसरी टीम ठरली. या सामन्यानंतर ऑरेन्ज
आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, हे आपण पाहणार आहोत.
दरम्यान 16 व्या मोसमात 62 सामने पार पडले. यातील काही सामन्यांचा अपवाद वगळता फाफने सुरुवातीपासूनच ऑरेन्ज कॅप आपल्याकडे कायम ठेवली आहे. तर शुबमन गिल याला हैदराबाद विरुद्ध शतक ठोकल्याने चांगलाच फायदा झालाय. शुबमनने पाचव्या क्रमांकावरुन थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतलीय.
त्यामुळे यशस्वी जयस्वाल याची तिसऱ्या स्थानी, डेव्हॉन कॉनवे याची चौथ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव याची पाचव्या स्थानी घसरण झाली. टॉप 5 मध्ये कुठलाही बदल नसला झाला, तरी फेरफार नक्कीच झाली. यामध्ये यशस्वी, डेव्हॉन आणि सुर्यकुमार या दोघांना प्रत्येकी 1 स्थानाचं नुकसान झालं.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
पर्पल कॅप कुणाची?
मोहम्मद शमी याला 4 विकेट्स विकेट्स घेतल्याचा मोठा फायदा झाला आहे. शमीने आपल्याच टीममधील राशिद खान याला मागे टाकून पर्पल कॅप पुन्हा पटकावली आहे. शमीने थेट चौथ्या क्रमांकावरुन अव्वल स्थानी झेर घेतली. शमीमुळे राशिदची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली.
राशिदला हैदराबाद विरुद्ध एकही विकेट घेता आली नाही. राशिद दुसऱ्या क्रमांकावर आल्याने युझवेंद्र चहल तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. चहलमुळे पीयूष चावला तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर आला. तर वरुण चक्रवर्थी पाचव्या क्रमांकावर कायम आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी आणि टी नटराजन.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, दासून शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नूर अहमद.