हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील 65 वा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने हैदराबादवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. हैदराबादने आरसीबीला हेनरिक क्लासेन याच्या शतकी खेळीच्या जोरावर 187 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात 19.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. विराट कोहली आणि कॅप्टन फाफ डु प्लेसिस ही जोडी आरसीबीच्या विजयाची शिल्पकार ठरली.
आरसीबीकडून विराट कोहली याने 63 बॉलमध्ये शतकी खेळी केली. विराटचं हे आयपीएल इतिहासातील सहावं शतक ठरलं. तर फाफ याने 71 धावांची खेळी केली. तर मायकल ब्रेसवेल आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी नाबाद 4 आणि 5 धावा केल्या. हैदराबादकडून टी नटराजन (इमपॅक्ट) आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
आरसीबीने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. आरसीबीने विजयासह मुंबई इंडियन्सला पछाडत पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे मुंबईची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मुंबई आणि आरसीबी दोन्ही संघाचे पॉइंट्स सारखे आहेत. मात्र नेट रन रेट चांगला असल्याने आरसीबी पुढे निघाली आहे. आरसीबीने या विजयासह मुंबई इंडियन्सला आणखी एक झटका दिला आहे.
ऑरेन्ज कॅप कुणाची?
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
या सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमधील पहिल्या 5 खेळाडूंमध्ये फक्त एकच बदल झाला आहे. हा बदल मुंबई इंडियन्सला जिव्हारी लागणारा असा आहे. विराट कोहली याला ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत शतकामुळे मोठा फायदा झाला आहे. त्यामुळेच सूर्यकुमार पहिल्या पाचातून बाहेर पडला आहे. तर फाफने अर्धशतकी खेळीसह आपल्या डोक्यावरची ऑरेन्ज कॅप आणखी घट्ट केली आहे.
पर्पल कॅप मोहम्मद शमी याच्याकडेच
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
तर दुसऱ्या बाजूला पर्पल कॅपमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे मोहम्मद शमी याच्याकडे पर्पल कॅप कायम आहे. तर इतर 4 गोलंदाजांनीही आपलं स्थान कायम राखण्यात यश मिळवलवंय.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा आणि मोहम्मद सिराज
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्करम (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार आणि नितीश रेड्डी.