मुंबई : आयपीएल 16 व्या मोसम जसाजसा पुढे सरकतोय तसातसा थरार आणि रंगत वाढत जातेय. क्रिकेट चाहत्यांना दररोज एकसेएक आणि थरारक सामने पाहायला मिळतेय. एकूण 10 संघांमध्ये सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जातोय. तसाच वैयक्तिक पातळीवर फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकण्यासाठी आणि ती कायम राहण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय. एका सामन्याने, एका धावेने आणि एका विकेटने ऑरेन्ज आणि पर्पल कॅपचं गणित ठरतयं. आज एकाकडे असलेली कॅप दुसऱ्या दिवशी कोणाकडे असेल, याबाबत कुणीही सांगू शकत नाही. यावरुन ही कॅप आपल्याकडे ठेवण्यासाठी किती चढाओढ आहे, याचा अंदाज बांधता येतो.
आयपीएलच्या प्रत्येक मोसमात सामन्यानुसार ज्या फलंदाजाचे सर्वाधिक धावा त्याला ऑरेंज कॅप देण्यात येते. तर सर्वाधिक विकेट्स असलेल्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. मोसमाअखेरीस ज्याच्या नावावर जास्त विकेट्स असतात, तो गोलंदाज आणि फलंदाज ती कॅप आपल्या नावावर करतो. मात्र मोसमादरम्यान कामगिरीनुसार कॅपची अदलाबदल होत असते.
फाफने आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांच्या मदतीने 20 चौकार आणि 18 सिक्स ठोकत 172.66 च्या स्ट्राईक रेटने 259 धावा केल्या आहेत. फाफची नाबाद 79* ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
पर्पल कॅप ही राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट्स सामन्यानंतर ही कॅप मार्क वूडला मिळाली आहे. यजुवेंद्र चहलला एकही विकेट न मिळाल्याने त्याच्याकडून ही कॅप मार्क वूडला मिळाली आहे. मार्क वूड याने 4 सामन्यात 16 ओव्हर टाकून 8.12 च्या इकॉनॉमी रेटने 130 धावा देत 11 विकेट्स घेतल्या आहेत. वूडची 14 धावा देत 5 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी आहे. तर चहलच्याही एकूण 11 विकेट्स आहेत.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायन्ट्सने 11 धावांनी विजय मिळवला. या विजयासह लखनऊने राजस्थान रॉयल्सच्या गुणांशी बरोबरी साधली आहे. दोन्ही संघांच्या नावावर प्रत्येकी सहा गुण आहेत. पण तरी गुणतालिकेत राजस्थानचा संघ अव्वल स्थानी आहे. कारण राजस्थानचा नेट रनरेट 1.043 आणि लखनऊचा नेट रनरेट 0.709 इतका आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, आवेश खान, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई