पश्चिम बंगाल | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 20 मे रोजी डबल हेडर सामने खेळवण्यात आले. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स टीमने दिल्ली कॅपिट्ल्स संघावर 77 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने या विजयासह प्लेऑफमध्ये एन्ट्री केली. तर दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर अवघ्या 1 धावेनी थरारक विजय मिळवला. एलएसजीने या विजयासह प्लेऑफमधील तिकीट निश्चित केलं.
रिंकू सिंह याने केकेआरला जिंकवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले. मात्र केकेआर अवघ्या 1 धावेनी मागे राहिली. लखनऊने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानासमोर केकेआरला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावाच करता आल्या. केकेआरकडून रिंकूने सर्वाधिक 67 धावांची नाबाद खेळी केली.
या डबल हेडरनंतर गुजरातनंतर चेन्नई आणि लखनऊने प्लेऑफसाठी प्रवेश मिळवला आहे. दरम्यान दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, हे आपण पाहुयात.
ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमधील पहिल्या 5 खेळाडूंमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र ऑरेन्ज कॅपमध्ये फक्त एका फलंदाजाने वरच्या क्रमांकावर उडी घेतली आहे.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
चेन्नईच्या डेव्हॉन कॉनवे याने 87 धावांची खेळी केली. त्यामुळे कॉनवेने पाचव्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतलीय. त्यामुळे शुबमन गिल याची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तसेच विराट कोहली चौथ्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी पोहचला आहे.
पर्पल कॅप कुणाची?
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
तर केकेआरच्या वरुण चक्रवर्थी याने लखनऊ विरुद्ध 1 विकेट घेतली. त्यामुळे चक्रवर्थीने पाचवं स्थान कायम राखलंय. सहाव्या क्रमांकावर सीएसकेचा तुषार देशपांडे हा आहे. तुषारच्या नावावर 20 विकेट्स आहेत. मात्र चक्रवर्थीचा इकॉनॉमी रेट चांगला असल्याने तो पाचव्या क्रमांकावर आहे.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पंड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्क्स स्टॉयनिस, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, आयुष बदोनी, के गौथम, के शर्मा, रवि बिश्नोई, मोहसिन खान आणि नवीन-उल-हक.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅर्णधार), जेसन रॉय, रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.