तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमातील 29 वा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. चेन्नईने या सामन्यात हैदराबादवर 7 विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादने विजयसाठी दिलेलं 135 धावांचं आव्हान चेन्नईने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. चेन्नईचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे याने सर्वाधिक 77 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्याच्या निकालानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपवर काही फरक पडलाय का, ऑरेन्ज आणि पर्पल कॅपची अदलाबदल झालीय का, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आयपीएलच्या एका मोसमात आणि मोसमादरम्यान सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेणाऱ्या फलंदाज आणि गोलंदाजाला ऑरेन्ज आणि पर्पल कॅप दिली जाते.
चेन्नईच्या विजयानंतरही पर्पल आणि ऑरेन्ज या दोन्हीही कॅप रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडेच अबाधित आहेत. पंजाब विरुद्ध आरसीबी यांच्यात गुरुवारी 20 एप्रिल रोजी डबल हेडरमधील सामना पार पडला. हा सामना आरसीबीने जिंकला.
या सामन्यात मोहम्मद सिराज याने 4 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन फाफ डु प्लेसिस याने 84 धावांची खेळी केली. त्यामुळे सिराजला पर्पल आणि फाफला ऑरेन्ज कॅप मिळाली. त्यानंतर डबल हेडरमधील दुसरा सामना हा दिल्ली विरुद्ध केकेआर यांच्यात पार पडला. या सामन्यामुळे कोणताही परिणाम या दोन्ही कॅपमधील यादीत झाला नाही.
त्यानंतर आता शुक्रवारी 21 एप्रिल रोजी चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना पार पडला. या सामन्याच्या निकालामुळेही ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या विजेत्यांमध्ये बदल झाला नाही. मात्र यामध्ये डेव्हॉन कॉनवे याला फायदा झालाय. तर वेंकटेश अय्यर आणि जॉस बटलर या दोघांना तोटा झालाय.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
कॉनवेने 77 धावांच्या नाबाद खेळीसह जॉस बटलर याला पछाडत चौथ्या स्थानी विराजमान झालाय. यामुळे बटलर पाचव्या स्थानी पोहचलाय. तर या सामन्याच्या निकालाआधीपर्यंत पाचव्या क्रमांकावर असलेला वेंकटेश अय्यर हा थेट सातव्या क्रमांकावर घसरलाय. तर दुसऱ्या बाजूला पर्पल कॅपमध्ये परिस्थिती जैसे थेच आहे. तिथे पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
चेन्नई प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, तुषार देशपांडे, महीष तीक्षणा, मतीषा पतिरणा आणि आकाश सिंह.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्करम (कर्णधार), मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासन (विकेटकीपर), मार्को यानसन, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि उमरान मलिक.