मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 22 एप्रिल रोजी 2 सामने पार पडले. पहिला सामना हा लखनऊ विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. तर दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यानंतर जसे पॉइंट्स टेबलमध्ये बदल झालेत, तसेच ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या यादीतही काही बदल झाले आहेत. आयपीएलच्या एका मोसमादरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. मोसमाअखेरीस ज्या गोलंदाज आणि फलंदाजाच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आणि धावा असतात, तो त्या ऑरेन्ज आणि पर्पल कॅपचा मानकरी ठरतो. तर मोसमादरम्यान या कॅपची अदलाबदल होत असते. एप्रिल 22 च्या 2 सामन्यानंतर या दोन्ही कॅप कुणाकडे आहेत, पहिल्या 5 खेळाडूंमध्ये कुणाचा समावेश आहे, हे आपण जाणून घेऊयात.
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने गुजरात विरुद्धच्या सामन्यात 68 धावांची खेळी केली. केएल राहुल याला त्याचा फायदा झाला. केएल राहुल याने यासह ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत पहिल्या पाचात धडक मारली आहे. केएल सीएसकेच्या डेव्हॉन कॉनवे याला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहचलाय. त्यामुळे डेव्हॉनची पाचव्या स्थानी घसरण झालीय. तर पाचव्या क्रमांकावर असलेला जॉस बटलर सहाव्या स्थानी घसरलाय.
मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याआधी पर्पल कॅप आरसीबीच्या मोहम्मद सिराज याच्याकडे होती. मात्र पंजाबच्या अर्शदीप सिंह याने मुंबई विरुद्ध 4 विकेट्स घेत सिराजला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं. यामुळे पर्पल कॅपच्या पहिल्या 5 गोलंदाजांच्या यादीत कमालीचा बदल झालाय. सिराजची दुसऱ्या स्थानी घसरण झाल्याचा फटका मार्क वूड याला बसलाय. वूड दुसऱ्यावरुन थेट चौथ्या स्थानी आलाय. तर राशिदमुळे तिसऱ्या क्रमांकावरील युजवेंद्र पाचव्या क्रमांकाववर आला आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, टिळक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | सॅम कुरन (कर्णधार), अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत सिंग भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.