बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमातील साखळी फेरीतील अखेरच्या डबल हेडरचं आयोजन हे रविवारी 21 मे रोजी करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स टीमने कॅमरुन ग्रीन याच्या शतकाच्या जोरावर सनरायजर्स हैदराबाद संघावर विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स टीमने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघावर मात केली. शुबमन गिल याच्या शतकी खेळीसमोर विराट कोहली याचं शतक वाया गेलं. या डबल हेडरमध्ये एकूण 3 आणि एकाच सामन्यात 2 शतक लगावले. त्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, हे आपण जाणून घेऊयात.
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीसने गुजरात विरुद्ध 28 धावांची खेळी केली. यासह फाफने ऑरेन्ज पर्पल कॅपवरची पकड आणखी मजबूत केलीय. तर विराट कोहली याने गुजरात विरुद्ध 101 धावांची खेळी करत काही वेळ थेट पाचव्या क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे यशस्वीची दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली. मात्र विराटचं दुसरं स्थान हे औटघटकेचं ठरलं.
ऑरेन्ज कॅपसाठी लढाई सुरुच
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
शुबमन गिल याने आरसीबी विरुद्धच्या याच सामन्यात नाबाद 104 धावांची खेळी करत विराटला मागे टाकलं. गिलने यासह चौथ्या क्रमांकावरुन थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली. त्याामुळे विराट तिसऱ्या क्रमांकावर आला. परिणामी यशस्वीची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली. तर सीएसकेच्या डेव्हॉन कॉनवे थेट तिसऱ्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी फेकला गेला.
गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमी आणि राशिद खान या दोघांनी आरसीबी विरुद्ध प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. त्यामुळे दोघांच्या नावावर एकूण आणि प्रत्येकी 24-24 विकेट्स आहेत. मात्र शमीचा इकॉनॉमी रेट चांगला असल्याने त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. तर राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
मुंबई इंडियन्सच्या पियूष चावला याला हैदराबाद विरुद्ध 1 विकेट घेऊन तिसऱ्या क्रमांकावर येण्याची संधी होती. मात्र पियूषला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे पियूष चौथ्या क्रमांकावर आहे. तर केकेआरचा वरुण चक्रवर्थी हा पाचव्या स्थानी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज आणि विजयकुमार वैशाख.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि यश दयाल.