मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 23 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं. यातील पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स टीमने जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली.चेन्नईचा हा सलग तिसरा विजय ठरला. या दोन्ही सामन्याच्या निकालानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप यादीत मोठा बदल झाला आहे. तर पर्पल कॅप पुन्हा आधीच्या गोलंदाजाकडे गेलीय. तर ऑरेन्ज कॅप होल्डरने आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलंय.
डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात राजस्थान विरुद्ध आरसीबीच्या मोहम्मद सिराज याने 1 विकेट घेतली. त्यामुळे सिराजने पुन्हा एकदा पर्पल कॅप पटकावलीय. त्यामुळे अर्शदीप दुसऱ्या स्थानावर आलाय. राजस्थान रॉयल्स टीमचा युजवेंद्र चहल यानेही 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.त्यामुळे चहल पाचव्यावरुन तिसऱ्या क्रमांकावर आलाय. यामुळे याआधी तिसऱ्या क्रमांकावर असेलला राशिद खान चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर तुषार देशपांडे 2 विकेट्समुळे तुषार पाचव्या क्रमांकावर आला. यामुळे मार्क वुड सहाव्या स्थानावर पोहचला.
पर्पल कॅप
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
ऑरेन्ज कॅपच्या यादीत पहिल्या स्थानी असलेल्या फाफ डु प्लेसिस याने राजस्थान विरुद्ध 62 धावा केल्या. तर विराट कोहली याला भोपळाही फोडता आला नाही. तेच सीएसकेच्या ऋतुराज गायकवाड याने 35 आणि डेव्हॉन कॉनवे याने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामुळे ऑरेन्ज कॅपमधील पहिल्या स्थानाचा अपवाद वगळता उर्वरित 4 स्थानांमध्ये बदल झालाय.
ऑरेन्ज कॅप
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
फाफने आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलंय. कॉनवे पाचव्या स्थानावरुन दुसऱ्या क्रमांकावर आला. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर याची तिसऱ्या आणि विराटची तिसऱ्यावरुन चौथ्या स्थानी घसरण झालीय. तर पाचव्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड याने स्थान मिळवलंय. तर केएल राहुल चौथ्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर पोहचलाय.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तिक्षाना.