IPL 2023 Orange and Purple Cap | ऑरेन्ज आणि पर्पल कॅपचा बादशाह कोण? पाहा यादी

| Updated on: Apr 25, 2023 | 12:36 AM

IPL 2023 Orange Cap and Purple Cap | आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमादरम्यान ऑरेन्ज आणि पर्पल कॅपची अदलाबादल होत असते. तर मोसमातील अंतिम सामन्याच्या निकालानंतर कायमचा त्या कॅपचा विजेता ठरतो.

IPL 2023 Orange and Purple Cap | ऑरेन्ज आणि पर्पल कॅपचा बादशाह कोण? पाहा यादी
Follow us on

हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील 34 वा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात पार पडला. दिल्ली कॅपिट्ल्सने हा सामना 7 धावांनी जिंकला. दिल्लीने बॅटिंग करताना 9 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 144 धावा केल्या. यामुळे सनरायजर्स हैदराबादला 145 धावांचं आव्हान मिळालं. हैदराबाद हे आव्हान पार करेल, असं क्रिकेट चाहत्यांना वाटत होता. सामना लो स्कोअरिंग असल्याने एकतर्फी होईल, असं वाटत होतं. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी कमाल केली. दिल्लीच्या गोलंदाजांनी 145 धावांचा शानदार बचाव केला. दिल्लीने हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानात 20 ओव्हरमध्ये 6 बाद 137 धावांवर रोखलं. दिल्ली कॅपिट्ल्सने सलग 5 सामने गमाल्यानंतर 2 सामन्यात सातत्याने विजय मिळवला. या सामन्यात विनिंग दिल्ली कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने 20 बॉलमध्ये 2 चौकार आणि 1 सिक्ससह 21 धावांची खेळी केली. वॉर्नरला या खेळीचा मोठा फायदा झाला आहे.

आयपीएल स्पर्धेत मोसमानंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हा ऑरेन्ज आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज हा पर्पल कॅप जिंकतो. तर मोसमादरम्यान ऑरेन्ज आणि पर्पल कॅपची अदलाबदल होत असते. हैदराबाद विरुद्ध दिल्ली या सामन्यानंतर वॉर्नर याला फायदा झालाय. ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या यादीत हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामन्यानंतर कोणताही बदल झालेला नाही. मात्र ऑरेन्ज कॅपच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वॉर्नरच्या धावांमध्ये तेवढा बदल झालाय. बाकी परिस्थिती जैसे थेच आहे.

टीमचं नाव फलंदाजाचं नाव एकूण सामनेएकूण धावाहायस्कोअर
गुजरात टायटन्स शुबमन गिल17890 129
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुफाफ डु प्लेसिस
1473084
चेन्नई सुपर किंग्स
डेव्हॉन कॉनव्हे16
672
92*
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली14639101*
राजस्थान रॉयल्सयशस्वी जयस्वाल14625 124

ऑरेन्ज कॅप आणि पर्पल कॅप आताही एकाच टीमकडे आहे. ऑरेन्ज कॅप ही आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस याच्याकडे आहे. तर पर्पल कॅप मोहम्मद सिराजच्या डोक्यावर आहे. सिराजच्या नावावर 7 सामन्यांमध्ये 13 विकेट्स आहे. तर फाफ डु प्लेसिसच्या नावावर 7 मॅचमध्ये 405 धावांची नोंद आहे.

टीमचं नावगोलंदाजाचं नाव एकूण सामने एकूण विकेट्स सर्वोत्तम कामगिरी
गुजरात टायटन्समोहम्मद शमी172811/4
गुजरात टायटन्समोहित शर्मा142710/5
गुजरात टायटन्सराशिद खान
172730/4
मुंबई इंडियन्स पीयूष चावला16 22 22/3
राजस्थान रॉयल्स युझवेंद्र चहल142117/4

सनरायजर्स हैजराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्करम (कॅप्टन), अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिक नॉर्तजे, कुलदीप यादव आणि इशांत शर्मा.