मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा आता ऐन रंगात आली आहे. जवळपास प्रत्येक संघात सुपर फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेचं गणित बदलतं तसंच गणित ऑरेंज आणि पर्पल कॅपचं देखील आहे. सामना संपला की संपला जास्त धावा आणि विकेट्सच्या जोरावर या मानाच्या कॅप दिल्या जातात. इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे 36 सामने संपले आहेत. कोलकाता विरुद्धचा सामना गमवला तरी आरसीबीच्या फलंदाज आणि गोलंदाजांकडे ऑरेंज आणि पर्पल कॅप आहे.
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांमध्ये आरसीबीच्या खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 36 सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करणारा आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने ऑरेंज कॅप घातली आहे. डुप्लेसिसने 8 सामन्यांत 422 धावा केल्या आहेत. त्याने 5 अर्धशतके झळकावली. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. किंग कोहलीने 8 सामन्यांत 321 धावा केल्या आहेत आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
गोलंदाजीत मोहम्मद सिराज सर्वाधिक विकेट्स घेऊन अव्वल स्थानावर आहे. 8 सामन्यांत 7.31 धावांच्या सरासरीने 14 बळी घेणाऱ्या सिराजने पर्पल कॅपचा मान मिळाला. सिराजला गुजरात टायटन्सचा फिरकीपटू रशीद खानकडून कडवी स्पर्धा आहे. राशिद खान 7 सामन्यांत 14 विकेट्स घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये पर्पल कॅपसाठी सिराज आणि रशीद यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोलकात्याचा संघ बंगळुरुवर भारी पडला आहे. कोलकात्याने बंगळुरुचा 21 धावांनी पराभव केला. आतापर्यंत झालेल्या 33 सामन्यातील 19 सामने कोलकात्याने, तर 14 सामने बंगळुरुने जिंकले आहेत. आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला कोलकात्याने दुसऱ्यांदा पराभूत केलं. पहिल्या सामन्यात 81 धावांनी पराभूत केलं. तर आता दुसऱ्या सामन्यात 21 धावांनी पराभवाचं तोंड पाहायला मिळालं.
बंगळुरुला पराभूत केल्याने केकेआरच्या स्पर्धेतील आशा अजुनही कायम आहेत. दोन गुणांचा फायदा झाल्याने आता सहा गुण झाले आहेत. अजूनही कोलकात्याला 6 सामने खेळायचे आहेत. यात काही वर खाली झालं तर नक्कीच सुपर फोरमध्ये स्थान मिळणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): एन जगदीसन (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसे, वैभव अरोरा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, विजयकुमार विशक, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.