जयपूर | आयपीएल 16 व्या मोसमातील 37 वा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या पहिल्या हंगामातील फायनलिस्ट संघात खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानने घरच्या मैदानात चेन्नईचा पराभव केला. राजस्थानने चेन्नईला विजयाासाठी 203 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईला 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 170 धावाच करता आल्या. अशाप्रकारे राजस्थानचा 32 धावांनी विजय झाला. राजस्थानचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला. राजस्थानने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 10 गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. राजस्थान या सिजनमध्ये 10 पॉइंट्स पूर्ण करणारी तिसरी टीम ठरली. तर चेन्नईने या हंगामातील तिसरा सामना गमावला. या सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमध्ये काय बदल झाला हे आपण जाणून घेऊयात.
चेन्नईचा सलामी फलंदाज डेव्हॉन कॉनवे याने राजस्थान विरुद्ध या सामन्यात 8 धावा केल्या. त्यामुळे कॉनव्हेचं तिसरं स्थान आणखी भक्कम झालंय. तर चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड याने 47 धावांची खेळी केली. त्यामुळे ऋतुराजची चौथ्या स्थानी एन्ट्री झालीय. परिणामी दिल्ली कॅपिट्ल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याची पाचव्या स्थानी घसरण झालीय.
तर राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवर बॅट्समन यशस्वी जयस्वाल याने 77 धावांची खेळी केली. त्यामुळे जयस्वाल सहाव्या क्रमांकावर पोहचलाय. तर कालपर्यंत पाचव्या क्रमांकावर असलेला केकेआर टीमचा बॅट्समन वेंकटेश अय्यर याची सातव्य क्रमांकावर उचलबांगडी झाली आहे. तर अव्वल स्थानी फाफ डु प्लेसिस कायम आहे. तसेच विराट कोहली हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑरेन्ज कॅप
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
या सामन्यात राजस्थान विरुद्ध तुषार देशपांडे याने 2 विकेट्स घेतल्याने पर्पल कॅपच्या टॉप 5 मध्ये बदल झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी मोहम्मद सिराज आणि राशिद खान कायम आहेत. तर तुषारने 2 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्यामुळे केकेआरच्या वरुण चक्रवर्थी याची चौथ्या आणि अर्शदीपची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
अर्शदीप पाचव्या क्रमांकावर फेकला गेल्याने 26 एप्रिलपर्यंत पाचव्या क्रमांकावर असलेला युजवेंद्र चहल हा सहाव्या स्थानी फेकला गेला आहे. युजवेंद्रला चेन्नई विरुद्धच्या सामन्यात विकेट घेण्यात अपयश आलं. यामुळे चहलला हा फटका सहन करावा लागला.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, अॅडम झम्पा, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थीक्षना आणि आकाश सिंग.