IPL 2023 Orange and Purple Cap | पर्पल आणि ऑरेन्ज कॅप कुणाच्या डोक्यावर?

| Updated on: Apr 29, 2023 | 12:54 AM

IPL 2023 Orange Cap and Purple Cap | ऑरेन्ज आणि पर्पल कॅपसाठी आयपीएल मोसमादरम्यान फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळते. या दोन्ही टोप्या सर्वाधिक विकेट्स आणि धावा करणाऱ्या खेळाडूच्या डोक्यावर विराजमान होत असतात.

IPL 2023 Orange and Purple Cap | पर्पल आणि ऑरेन्ज कॅप कुणाच्या डोक्यावर?
Follow us on

मोहाली | आयपीएल 16 व्या हंगामातील 38 वा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स टीमने पंजाब किंग्स संघावर 56 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. हा सामना हायस्कोअरिंग झाला. लखनऊने पंजाबला 258 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबनेही सामना एकतर्फी होऊ दिला नाही. पंजाबनेही चांगली झुंज दिली. पंजाबने 19.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 201 धावा केल्या. अखेर पंजाबला विजयासाठी 56 धावा कमी पडल्या. या सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, हे आपण जाणून घेऊयात.

आयपीएलच्या एका मोसमात आणि आणि त्या दरम्यान सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या फलंदाज आणि गोलंदाजाला कॅप दिल्या जातात. या दरम्यान सामन्यांनुसार या कॅपची अदलाबदल होत असते. आता या पंजाब विरुद्ध लखनऊ मॅचनंतर पर्पल आणि ऑरेन्ज कॅप आहे त्याच खेळाडूंकडे आहेत. ऑरेन्ज कॅपच्या टॉप 5 फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र पंजाबच्या अर्शदीप सिंह याने 1 विकेट घेतल्याने पर्पल कॅपच्या पहिल्या पाचात वरखाली थोडेफार बदल झाले आहेत.

पर्पल कॅप

टीमचं नावगोलंदाजाचं नाव एकूण सामने एकूण विकेट्स सर्वोत्तम कामगिरी
गुजरात टायटन्समोहम्मद शमी172811/4
गुजरात टायटन्समोहित शर्मा142710/5
गुजरात टायटन्सराशिद खान
172730/4
मुंबई इंडियन्स पीयूष चावला16 22 22/3
राजस्थान रॉयल्स युझवेंद्र चहल142117/4

अर्शदीप 1 विकेट घेतल्याने तो थेट पाचव्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या स्थानी आला आहे. अर्शदीप तिसऱ्या स्थानी आल्याने तुषार देशपांडे याची चौथ्या आणि वरुण चक्रवर्ती याची पाचल्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर ऑरेन्ज कॅपमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

ऑरेन्ज कॅप कुणाकडे?

ऑरेन्ज कॅपही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार  फाफ डु प्लेसिस याच्याकडेच आहे. फाफने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ऑरेन्ज कॅप ही आपल्याकडे कायम राखली आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीच्याच मोहम्मद सिराज याच्याकडेच पर्पल कॅप आहे. त्यामुळे आरसीबीच्याच दोन्ही खेळाडूंकडेच या कॅप्स आहेत.

ऑरेन्ज कॅप

टीमचं नाव फलंदाजाचं नाव एकूण सामनेएकूण धावाहायस्कोअर
गुजरात टायटन्स शुबमन गिल17890 129
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुफाफ डु प्लेसिस
1473084
चेन्नई सुपर किंग्स
डेव्हॉन कॉनव्हे16
672
92*
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली14639101*
राजस्थान रॉयल्सयशस्वी जयस्वाल14625 124

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, यश ठाकूर, रवि बिश्नोई, आवेश खान आणि नवीन-उल-हक.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, गुरनूर ब्रार आणि अर्शदीप सिंग.