मुंबई : आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामने पार पडले. या दोन सामन्यानंतर आयपीएल गुणतालिकेचं तर गणित बदललं पण ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावर असा प्रश्न पडला आहे. आयपीएल स्पर्धाचे अंतिम सामन्यानंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हा ऑरेंज आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज हा पर्पल कॅप जिंकतो. पण अंतिम सामन्यापर्यंत ऑरेंज आणि पर्पल कॅपची अदलाबदल होत असते. त्यामुळे खेळाडूंमध्ये चढाओढ पाहायला मिळते.
आयपीएल सुरु झाल्यापासून ऑरेंज कॅप फाफच्या डोक्यावर कायम आहे. जबरदस्त फॉर्मात असल्याने त्याच्याकडून कॅप हिसकावून घेणं कठीण आहे. पण राजस्थान रॉयल्चा यशस्वी जैस्वाल आता कॅपच्या जवळ पोहोचला आहे. दोघांमध्ये फक्त 38 धावांचं अंतर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फाफ डु प्लेसिस 9 सामन्यात 466 धावा करून अव्वल स्थानी आहे. तर राजस्थानचा यशस्वी जैस्वाल 428 धावांसह दुसऱ्या, चेन्नई सुपर किंग्सचा डेव्हॉन कॉनव्हे 414 धावांसह तिसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली 364 धावांसह चौथ्या आणि चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड 354 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. या संघातील मोहम्मद शमी जबरदस्त गोलंदाजी करत आहे. त्याचा स्विंग आणि सीमची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मोहम्मद शमीने 9 सामन्यात 17 गडी बाद करत अव्वल स्थान गाठलं आहे. तर 17 विकेट घेतल चेन्नई सुपर किंग्सचा तुषार देशपांडे दुसऱ्या स्थानी आहे. या इकोनॉमी रेट्सचा फरक आहे. तर पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंग 16 विकेटसह तिसऱ्या, मुंबई इंडियन्सचा पियुष चावला 15 विकेटसह चौथ्या, आणि आरसीबीचा मोहम्मद सिराज 15 विकेटसह पाचव्या स्थानावर आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या दोन्ही संघांनी प्रत्येकी गुण देण्यात आला आहे. यामुळे गुणतालिकेत लखनऊचा संघ दुसऱ्या, चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
मुंबई इंडियन्सनं मागच्या काही सामन्यात जबरदस्त कामगिरी करत कमबॅक केलं आहे. पंजाब किंग्सने 20 षटकात 3 गडी गमवून 214 धावा केल्या आणि विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. मुंबईने हे आव्हान 18.5 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात इशान किशननं 41 चेंडूत 75 आणि सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत 66 धावा केल्या.