IPL 2023 Orange and Purple Cap | रविवारच्या डबल हेडरनंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?

| Updated on: Apr 30, 2023 | 11:53 PM

IPL 2023 Orange Cap and Purple Cap | ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठा उलटफेर झाला आहे. मुंबईच्या दोन्ही खेळाडूंनी धमाका केला आहे. या दोघांनी शानदार कामगिरी केली आहे.

IPL 2023 Orange and Purple Cap | रविवारच्या डबल हेडरनंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 30 एप्रिलला 2 सामने पार पडले. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. तर दुसरा सामन्यात मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या दोन सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या यादीतील पहिल्या 5 खेळाडूंमध्ये फार मोठी अदलाबदल झाली आहे. शनिवारी 29 एप्रिलपर्यंत ऑरेन्ज आणि पर्पल कॅप मिरवणाऱ्या एकाच टीमच्या दोन्ही खेळाडूंना मोठा झटका लागला आहे. युवा आणि नव्या दमाच्या खेळाडूंनी ऑरेन्ज आणि पर्पल कॅप मिळवत एकाच टीमच्या दोन्ही खेळाडूंची असलेली मक्तेदारी मोडून काढली आहे. तसेच पहिल्या 5 खेळाडूंमध्ये झालेले बदल आपण जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वाल याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 124 धावांची शतकी खेळी केली. यासह जयस्वालने आरसीबीच्या फाफ डु प्लेसिस याला पछाडत ऑरेन्ज कॅप मिळवली आहे. तसेच पंजाब किंग्स विरुद्ध डेव्हॉन कॉनवे याने नाबाद 92 आणि ऋतुराज गायकवाड याने 37 धावा केल्या. या दोघांना या खेळीचा फायदा झालाय.

ऑरेन्ज कॅप

टीमचं नाव फलंदाजाचं नाव एकूण सामनेएकूण धावाहायस्कोअर
गुजरात टायटन्स शुबमन गिल17890 129
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुफाफ डु प्लेसिस
1473084
चेन्नई सुपर किंग्स
डेव्हॉन कॉनव्हे16
672
92*
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली14639101*
राजस्थान रॉयल्सयशस्वी जयस्वाल14625 124

यशस्वी अव्वल स्थानी गेल्याने फाफ दुसऱ्या क्रमांकावर आलाय. कॉनवे नाबाद 92 धावांच्या खेळीसह शुबमन गिल याला पछाडत चौथ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी आलाय. तर ऋतुराज 37 रन्समुळे पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर आलाय. तर विराटची दुसऱ्या क्रमांकावरुन थेट पाचव्या पोजिशनवर फेकला गेलाय. तसेच शनिवारपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर असलेला शुबमन हा डेव्हॉनमुळे थेट सहाव्या स्थानी घसरलाय.

पर्पल कॅपनेही डोकं बदललं

रविवारच्या डबल हेडरनंतर पर्पल कॅपनेही डोकं बदललं आहे. आरसीबीच्या मोहम्मद सिराज याच्याकडे गेल्या काही दिवसांपासून ही कॅप होती. मात्र ती मक्तेदारी चेन्नई सुपर किंग्सच्या तुषार देशपांडे याने मोडीत काढली आहे. तुषारने पंजाब विरुद्धच्या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. तुषारने यासह चौथ्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर उडी घेतली. तर अर्शदीप सिंह यानेही चेन्नई विरुद्ध 1 विकेट घेतली. यामुळे अर्शदीपने राशिद खान याला मागे टाकतं दुसरं स्थान काबिज केलंय. मोहम्मद सिराज हा थेट पहिल्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकांवर आलाय. राशिद खान दुसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी आला.

पर्पल कॅप

टीमचं नावगोलंदाजाचं नाव एकूण सामने एकूण विकेट्स सर्वोत्तम कामगिरी
गुजरात टायटन्समोहम्मद शमी172811/4
गुजरात टायटन्समोहित शर्मा142710/5
गुजरात टायटन्सराशिद खान
172730/4
मुंबई इंडियन्स पीयूष चावला16 22 22/3
राजस्थान रॉयल्स युझवेंद्र चहल142117/4

तर दुसऱ्या बाजूला पीयूष चावला याने राजस्थान विरुद्ध 2 विकेट्स घेतल्या. पीयूष यासह पाचव्या क्रमांकावर आला. त्याने गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमी याला मागे टाकलं. शमी आता ताज्या आकडेवारीनुसार सातव्या क्रमांकावर घसरलाय.

मुंबईकर पोरं हुशार

तुषार देशपांडे आणि यशस्वी जयस्वाल हे दोघेही मुंबईकर खेळाडू आहेत. हे दोघेही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. दरम्यान आता हे दोघे फाफ आणि मोहम्मद सिराज यांच्या दोघांसारखंच किती दिवस या कॅप आपल्याकडे कायम राखणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.