लखनऊ | आयपीएल 16 व्या पर्वातील 47 वा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात राजीव गांधी स्टेडियम इथे पार पडला. कोलकाताने हैदराबादवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. केकेआरने हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सटीमचा हा या सिजनमधील चौथा विजय ठरला. यासह कोलकाता नाईट रायडर्सने या मोसमातील आपलं आव्हान कायम राखलंय. तर हैदराबादचा जवळपास बाजार उठला. दरम्यान या सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या गणितात काय बदल झालाय का, ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
एका मोसमात सर्वाधिक धावा असणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलरला पर्पल कॅप दिली जाते. तसेच मोसमादरम्यान कामगिरीनुसार या कॅपची अदलाबदल होत असते.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
हैदराबाद विरुद्ध केकेआर सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप आहे त्याच खेळाडूंकडे आहे. पर्पल कॅप गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमी याच्या डोक्यावरच कायम आहे. तर ऑरेन्ज कॅप रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फलंदाज फाफ डु प्लेसिस याच्याकडेच आहे. तसेच या दोन्ही कॅपमधील पहिल्या पाच खेळाडूंमध्ये काहीही फरक पडलेला नाही.
फाफ डु प्लेसीस याच्या डोक्यावर ऑरेन्ज कॅप आहे. तर त्याखाली अनुक्रमे यशस्वी जयस्वाल, डेव्हॉन कॉनवे, विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
तर पर्पल कॅपच्या शर्यतीत मोहम्मद शमी हा अव्वल स्थानी आहे. तर त्या खालोखाल तुषार देशपांडे, अर्शदीप सिंह, पियूष चावला आणि मोह्म्मद सिराज हे आहेत. आता येत्या आठवड्यांमध्ये प्लेऑफसाठी संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. अशात आता या ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत तगडी चुरस पाहायला मिळणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, आर गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, आर सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, एच राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (wk), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, कार्तिक त्यागी आणि टी नटराजन.