जयपूर | आयपीएल 16 व्या मोसमात 48 वा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सने 9 विकेट्सने शानदार आणि धमाकेदार एकतर्फी असा विजय मिळवला. राजस्थानने पहिले बॅटिंग करताना गुजरातला विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान 1 विकेटच्या मोबदल्यात 13.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. गुजरातकडून ऋद्धीमान साहा याने नाबाद 41 आणि कॅप्टन हार्दिक पंड्या याने नॉट आऊट 39 रन्स केल्या. तर शुबमन गिल याने 36 रन्सचं योगदान दिलं. राजस्थानकडून युजवेंद्र चहल याने एकमेव विकेट घेतली.
त्याआधी राजस्थानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. गुजरातने राजस्थानला 17.5 ओव्हरमध्ये 118 धावांवर ऑलआऊट केलं. राजस्थानकडून कॅप्टन संजू सॅमसन याने सर्वाधिक 30 धावा केल्या. तर ट्रेन्ट बोल्ट याने 15, यशस्वी जयस्वाल 14 आणि देवदत्त पडीक्कल याने 12 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त उर्वरित एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.
गुजरातकडून राशिद खान याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नूर अहमद याने 2 फलंदाजांना चालता केला. तर मोहम्मद शमी, कॅप्टन हार्दिक पंड्या आणि जोशुआ लिटील या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. या गुजरातने या विजयासह पॉइंट्स टेबलमधील अव्वल स्थान कायम राखलं. गुजरातचा हा या पर्वातील सातवा विजय ठरला. या सामन्याच्या निकालानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपविनर खेळाडूंच्या यादी काय हालचाल झालीये का, हे आपण जाणून घेऊयात.
गुजरातच्या शुबमन शुबमन गिल आणि राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वाल या फलंदाजांनी अनुक्रमे केलेल्या 36 आणि 14 धावांमुळे दोघांना चांगलाच फायदा झालाय. यशस्वीने आपलं दुसरं स्थान आणखी भक्कम केलंय. तर शुभमन गिल याने थेट चौथ्या स्थानी झेप घेतलीय. त्यामुळे विराट कोहली याची चौथ्यावरुन पाचव्या आणि ऋतुराज गायकवाड पाचव्या वरुन सहाव्या स्थानी घसरण झालीय. तर फाफ डु प्लेसीस याच्याकडेच ऑरेन्ज कॅप कायम आहे.
ऑरेन्ज कॅप
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
मोहम्मद शमीने 1 विकेट घेत पर्पल कॅप आपल्या डोक्यावर आणखी घट्ट घातलीय. राशिद खान याने 3 विकेट घेत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आणि तुषार देशपांडे याला तिसऱ्या क्रमांकावर फेकलं. त्यामुळे अर्शदीप सिंह याची चौथ्या आणि पियूष चावला याची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली. तर मोहम्मद सिराज हा सहाव्या क्रमांकावर पोहचला.
पर्पल कॅप
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि जोशुआ लिटल.