नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या हंगामात शनिवारी 6 मे रोजी 2 सामने पार पडले. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नईने मुंबईवर 6 विकेट्सने विजय मिळवला. तर दुसरा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात आला. दिल्लीने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. या दोन्ही सामन्यात अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. त्यामुळे या खेळाडूंना ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत चांगला फायदा झाला. कुणी पहिल्या स्थानी झेप घेत कॅप पटकावली. तसेच कुणी चांगली कामगिरी करत आपलं स्थान भक्कम केलं तर कुणी पहिल्या पाचात धडक मारली. या दोन्ही सामन्यानंतर या ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कुणाला फायदा कुणाला तोटा झालाय, हे देखील आपण जाणून घेऊयात.
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस याने दिल्ली विरुद्ध 45 धावा केल्या. फाफने 45 धावांसह पहिलं स्थान आणखी भक्कम केलंय. चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज डेव्हॉन कॉनवे याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 44 रन्स ठोकल्या. कॉनवेने यासह यशस्वी जयस्वाल याला पछाडत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे यशस्वी तिसऱ्या स्थानी घसरला. आरसीबीच्या विराट कोहली याने दिल्ली विरुद्ध 55 धावा करत पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी झेप घेतलीय. त्यामुळे शुबमन गिल हा थेट चौथ्या क्रमांकावरुन सहाव्या स्थानी फेकला गेलाय. तर मुंबई विरुद्ध 30 धावा ठोकल्याने चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड याची सहाव्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी एन्ट्री झालीय.
ऑरेन्ज कॅप
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
शनिवार 6 मे च्या डबल हेडरनंतर पर्पल कॅपमध्ये मोठा उलटफेर झालाय. चेन्नई सुपर किंग्सच्या तुषार देशपांडे याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 विकेट्स घेतल्या. तुषारने यासह पर्पल कॅप पुन्हा मिळवली. तुषारच्या नावावर 19 विकेट्स झाल्या आहेत. तुषार यासह मोहम्मद शमी याला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहचलाय. त्यामुळे शमीची दुसऱ्या आणि राशिद खान याची दुसऱ्यावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झालीय. तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा अनुभवी फिरकी गोलंदाज पीयूष चावला याने चेन्नईच्या 2 फलंदाजांना बाद केल्याने त्याची पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी एन्ट्री झालीय. परिणामी पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंह हा पाचव्या क्रमांकावर आलाय.
पर्पल कॅपू
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूड.