पश्चिम बंगाल | रिंकू सिंह याने कोलकाता नाईट रायडर्स टीमला पंजाब किंग्स टीमवर 1 बॉलमध्ये 2 धावांची गरज असताना चौकार ठोकून सनसनाटी विजय मिळवून दिला. पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. कॅप्टन नितीश राणा याची अर्धशतकी खेळी आणि आंद्रे रसेल याच्या तडाख्यामुळे केकेआरला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 6 धावांची गरज होती. रिंकू सिंह आणि रसेल ही जोडी शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानात होती. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये निर्णायक क्षणी आंद्रे रसेल आणि झाला त्यामुळे रिंकू स्ट्राईक एंडवर गेला आणि शार्दुल ठाकूर मैदनात आला. त्यामुळे सामन्यात आणखी रंगत आली.
रिंकू मैदानात असल्याने कोलकाता चाहत्यांना आशा होती. रिंकून चाहत्यांची निराशा केली नाही. रिंकूने अर्शदीपच्या बॉलिंगवर शेवटच्या बॉलवर चौका ठोकत केकेआरला विजयी केलं. केकेआरने 180 धावांचं आव्हान गाठण्यासाठी 5 विकेट्स गमावल्या. केकेआरचा हा या मोसमातला 5 वा विजय ठरला. तर पंजाबला या हंगामात सहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.
त्याआधी पंजाबने टॉस जिंकून शिखर धवन याच्या 57 धावांच्या जोरावर 7 विकेट्स गमावत 179 धावा केल्या. तर केकेआरकडून वरुण चक्रवर्थी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. या विजयानंतर केकेआरसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केकेआरच्या वरुण चक्रवर्थी याने पर्पल कॅपच्या शर्यतीत बाजी मारली आहे. नक्की काय झालंय, आपण सविस्तर जाणून घेऊयात.
वरुणने 3 विकेट्स घेतल्याने त्याची सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे वरुणला पर्पल कॅप जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे केकेआरसाठी एका अर्थाने ही गूडन्युजच आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
वरुणने 3 विकेट्स घेतल्याने तो पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. वरुणमुळे राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहल याची पाचव्यावरुन सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. पर्पल कॅपच्या पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये हा एकमेव बदलच रविवारच्या तुलनेत सोमवारी झालाय.
तर ऑरेन्ज कॅपच्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस याच्याच डोक्यावर ऑरेन्ज कॅप आहे.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
पंजाब किंग्स प्लेंइग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभासिमरन सिंग, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, रिशी धवन राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), वेंकटेश अय्यर, आर गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वैभव अरोरा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.