मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात मंगळवारी 9 मे रोजी 54 वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने होते. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 200 धावांचं राउंड फिगर लक्ष्य मिळालं. मुंबईने हे आव्हान सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 4 विकेट्सच्या मोबदल्यात 16.3 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. मुंबईने यासह आरसीबावर मात करत मागील पराभवाचा वचपा घेतला. तसेच मुंबईची ही 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करुन विजय मिळवण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली आहे.
मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 35 बॉलमध्ये सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. यात सूर्याने 7 चौकार आणि 3 कडक सिक्स ठोकले. तर नेहल वढेरा याने 34 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 कचकचीत सिक्सच्या मदतीने नाबाद 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. इशान किशन याने 21 बॉलमध्ये 42 धावा करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. कॅप्टन रोहित शर्मा याने 7 धावा जोडल्या. तर कॅमरुन ग्रीने याने नॉट आऊट 2 रन्स केल्या. आरसीबीकडून वानिंदू हसरंगा आणि विजयकुमार वैशाक या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्याआधी मुंबईने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने 65 रन्स केल्या. ग्लेन मॅक्सवेल याने 68 धावा जोडल्या. दिनेश कार्तिक याने शेवटच्या काही षटकांमध्ये काही मोठे फटके मारत 30 रन्स केल्या. तर वानिंगदू हसरंगा आणि केदा जाधव या दोघांनी प्रत्येकी नाबाद 12 धावा केल्या.
विराट कोहली आणि महिपाल लोमरुर या दोघांनी प्रत्येकी 1 धाव करुन आऊट झाले. अनुज रावतने 6 रन्स काढल्या. मुंबईकडून जेसन बेहरनड्रॉफ याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कॅमरुन ग्रीन, ख्रिस जॉर्डन आणि कुमार कार्तिकेय या तिकडीने निर्णायक क्षणी प्रत्येकी 1 विकेट घेत जेसनला चांगली साथ दिली.
मुंबईचा हा या मोसमातील सहावा विजय ठरला. मुंबईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. या सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, हे आपण पाहणार आहोत.
ऑरेन्ज कॅप कुणाकडे?
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
पर्पल कॅप कुणाची
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
मुंबई विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र फाफने 65 धावा करत आपलं अव्वल स्थान मजबूत केलंय.तर विराट कोहली देखील 1 रन करुनही पाचव्या क्रमांकावर कायम आहे. तर पर्पल कॅपच्या पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये बदल झालेला नाही.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, आणि जेसन बेहरेनडॉर्फ.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूड.