मुंबई | जगातील लोकप्रिय टी 20 क्रिकेट लीगपैकी एक म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल. या स्पर्धेच्या 16 व्या मोसमाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील सलामीचा सामना हा गुजरात जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीआधी सर्व संघानी सरावाला सुरुवात केली आहे. मात्र त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. एक मोठा स्टार बॅट्समन या स्पर्धेतून आऊट अर्थात बाहेर झालाय. तसेच त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. टीमने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंडचा स्टार आणि अनुभवी बॅट्समन जॉनी बेयरस्टो हा आयपीएलमधील पंजाब किंग्स टीमचा भाग होता. मात्र तो दुखापतीमुळे या संपूर्ण पर्वात खेळू शकणार नाही. जॉनी याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पायाला दुखापत झाली होती. जॉनी या दुखापतीतून अजूनही सावरतोय. त्यामुळे जॉनी या स्पर्धेत खेळण्यासाठी असमर्थ आहे. पंजाब किंग्स मॅनेजमेंटने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
“आम्हाला सांगताना फार वाईट वाटतंय की जॉनी बेयरस्टो दुखापतीमुळे या मोसमात खेळणार नाही. तो या दुखापतीतून लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. तसेच तो पुढील हंगामात आमच्यासोबत पाहण्यासाठी उत्सूक आहोत. जॉनीच्या जागी टीममध्ये मॅथ्यू शॉर्ट याचा समावेश करण्यात आला आहे”, असं पंजाब किंग्सने ट्विटमध्ये म्हटलंय.
जॉनी बेयरस्टो आऊट
? IMPORTANT UPDATE ?
We regret to inform you that Jonny Bairstow will not be a part of the IPL this season because of his injury. We wish him the best and look forward to seeing him next season.
We are pleased to welcome Matthew Short as his replacement.
#PunjabKings pic.twitter.com/NnUMjCe8jV
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 25, 2023
मॅथ्यू शॉर्ट हा ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर खेळाडू आहे. मॅथ्यू याने बिग बॅश लीगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. मॅथ्यू हा पर्थ स्कॉचर्सकडून खेळताना प्लेअर ऑफ टुर्नामेंट ठरला होता. तसेच मॅथ्यू याने बऱ्याच लीगमध्ये आपली छाप सोडली आहे. या कामगिरीच्या जोरावर मॅथ्यू याची जॉनी बेयरस्टो याच्या जागेवर निवड करण्यात आली आहे.
शिखर धवन (कॅप्टन), शाहरुख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषि धवन, लियम लिविंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, नाथन एलिस, कगिसो रबाडा, राहुल चाहर, हरप्रीत बराड़, सॅम करन, सिकंदर रजा, हरप्रीत सिंह भाटिया, विध्वत कवेरप्पा, मोहित राठी आणि शिवम सिंह.