मोहाली | लखनऊ सुपर जायंट्स टीमने पंजाब किंग्सवर 56 धावांनी विजय मिळवला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 258 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र लखनऊच्या गोलंदाजांसमोर पंजाबला 19.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 201 धावाच करता आल्या. लखनऊचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला. पंजाबकडून अर्थव तायडे याने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. सिकंदर रजा याने 36, जितेश शर्मा 24, लियाम लिविंगस्टोन 23, सॅम करण 21 धावांची खेळी केली. या सर्वांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र अथर्वसारखी इतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. पंजाबची सलामी जोडी सपेशल अपयशी ठरली. प्रभासिमरन सिंह 9 तर कॅप्टन शिखर धवन 1 धाव करुन माघारी फिरला. शाहरुख खान 6 धावांवर बाद झाला. राहुल चाहर आणि कगिसो रबाडा दोघेही झिरोवर आऊट झाले. तर अर्शदीप सिंह 2 धावांवर नाबाद राहिला.
लखनऊकडून यश ठाकूर सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नवीन उल हक याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रवि बिश्नोई याने 2 तर मार्क्स स्टोयिनस याने 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली.
दरम्यान त्याआधी पंजाबने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 257 धावा केल्या. लखनऊच्या सर्वच फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. लखनऊकडून मार्क्स स्टोयनिस याने 40 चेंडूत सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. कायले मेयर्स याने 24 बॉलमध्ये 54 रन्सचं योगदान दिलं. निकोलस पूरन याने 45 धावा केल्या. आयुष बदोनी 43 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन केएल राहुल 12 धावांवर आऊट झाला. दीपक हुड्डा याने नाबाद 11 आणि कृणाल पंड्याने 5* धावा केल्या. तर पंजाब किंग्सकडून कगिसो रबाडा याने 2 विकेट्स घेतल्या. सॅम करण, अर्शदीप सिंह आणि लियाम लिविंगस्टोन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपर हुड्डा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, यश ठाकूर, रवि बिश्नोई, आवेश खान आणि नवीन-उल-हक.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, गुरनूर ब्रार आणि अर्शदीप सिंग.