मुंबई | मुंबई इंडियन्स टीमला 22 एप्रिलला पंजाब किंग्स कडून पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचा हा 6 सामन्यांमधील तिसरा पराभव ठरला. आयपीएल 16 व्या मोसमातील 31 व्या सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झाला. हा सामना हायस्कोअरिंग झाला. या सामन्यात 400 पेक्षा अधिक धावा झाल्या. क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात चौकार षटकारांचा तुफान पाहायला मिळाला. दोन्ही संघांकडून जोरदार फटकेबाजी करण्यात आली. पंजाबने जोरदार बॅटिंग केली आणि 20 ओव्हमध्ये 214 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 215 धावांचं आव्हान मिळालं. मुंबईनेही या धावांचं शेवटपर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईचे प्रयत्न थोडक्यासाठी कमी पडले. मुंबईला 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अर्शदीप पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. अर्शदीपने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
मुंबईला या पराभवानंतर मजबूत ट्रोल करण्यात आलं. या सामन्यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मुंबईची 215 धावांची पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात राहिला. त्यानंत सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये असं काही घडलं ज्यामुळे पंजाब किंग्सने मुंबईला ट्रोल केलं, खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.
पंजाबने ट्विट करत मुंबई पोलिसांना त्यात टॅग केलं. पंजाब किंग्स सोशल मीडिया टीमने मुंबई पोलिसांना उल्लेखून “आम्हाला एक गुन्हा नोंदवायचा आहे”, असं ट्विट केलं. अर्शदीपने मुंबई इंडियन्सच्या डावातील 20 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर पहिले टिळक वर्मा याचा मिडल स्टंप उडवला. त्यानंतर पुढील बॉलवर नेहल वढेरा याला त्याच पद्धतीने क्लिन बोल्ड करत अर्शदीपने पुन्हा मिडल स्टंपचे 2 तुकडे केले.
पंजाबने डिवचलंय म्हटल्यावर मुंबई इंडियन्स सोशल मीडिया टीम पेटून उठली. पंजाबला मिर्ची लागेल, झोंबेल असं ट्विट मुंबई इंडियन्सने मुंबई पोलिसांना टॅग करत ट्विट केलंय. “मुंबई पोलीस तुम्ही हरवलेल्या गोष्टीबाबत तक्रार दाखल करु शकता का! पंजाब किंग्सची ट्रॉफी गेल्या 15 वर्षांपासून हरवली आहे”, असं ट्विट मुंबई इंडियन्सने केलंय.
मुंबई पोलिसांकडून पंजाब किंग्सची फिरकी
Action is most likely to be taken on breaking the law, not stumps! https://t.co/bo8jgafACm
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) April 22, 2023
दोन्ही संघाच्या सोशल मीडिया टीमची हमरीतुमरी पाहून चाहत्यांनाही हसू आवरलं नाही. पोलिसांना अखेर मध्यस्थी करावी लागलीच. मुंबई पोलिसांनी मुंबई इंडियन्सनंतर पंजाब किंग्सची फिरकी घेतली. नियम तोडल्यास कारवाई केली जाते, स्टंप्स तोडल्यावर नाही”, असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आणि पंजाबची फिरकी घेतली.
मुंबई पोलिसांचं पंजाबला जशात तसं उत्तर
Like Addhar for Indian citizens, trophy is mandatory for IPL franchise to report a FIR. https://t.co/Ra2WY4RywD
— Mumbai Police (@MumbaiPolicee) April 22, 2023
तसंच “भारतीय नागरिकांसाठी आधार बंधनकारक आहे. त्याप्रमाणे आयपीएल टीमसाठी तक्रार नोंदवण्यासाठी ट्रॉफी जिंकणं गरजेचं आहे”, असं ट्विटला उत्तर देत मुंबई पोलिसांनी पंजाब किंग्सचं तोंड बंद केलं.