मुंबई : आयपीएलमधील 66 वा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सुरू आहे. या सामन्यात पंजाब संघ प्रथम फलंदाजी करत आहे. मात्र पंजाबची एकदम खराब सुरूवात झालेली पाहायला मिळत आहे. पंजाबने सात ओव्हरच्या आत आपले चार मुख्य खेळाडू गमावले आहेत. पॉवर प्लेमध्ये शिखर धवन आणि प्रभसिमरन यांना मजबूत सलामी देता आली नाही. मागील सामन्यामध्ये 94 धावांची खेळी केलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनला सामन्यात फारशी कमाल दाखवता आली नाही.
टीम इंडियाचा युवा खेळाडू आणि राजस्थानचा खेळाडू नवदीप सैनी याने आपल्या भेदक गोलंदाजीने पंजाबच्या तीन मुख्य फलंदाजांना माघारी धाडलं होतं. यामध्ये अथर्व तायडे, लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना आऊट केलं. यामधील लिव्हिंगस्टोनची विकेट एकदम झकास होती, त्याला चारीमुंड्या चीत केलं. दिल्ली कॅपिटल्स संघाला पिसणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनच्या टीम इंडियाच्या युवा बॉलरने दांड्या गुल केल्या आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Why was Liam Livingstone laughing after getting bowled by Navdeep Saini? #PBKSvsRR #PBKSvRR #IPLPlayOffs #CricketTwitterpic.twitter.com/GfpUKLscGz
— 12th Khiladi (@12th_khiladi) May 19, 2023
सामन्यातील सातव्या ओव्हरमध्ये नवदीप सैनीचा एक चेंडू कीपरच्या डोक्यावरून मारण्याच्या प्रयत्नात तो फसला. त्यावेळी त्याच्या पायाला चेंडू लागला होता त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात लिव्हिंगस्टोन बोल्ड आऊट झाला.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन) प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, एडम झॅम्पा, ट्रेन्ट बोल्ट, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल