मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंग चढला आहे. अजूनही प्लेऑफचं गणित सुटलं नसल्याने जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. त्यात गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दुसऱ्या स्थानी पोहोचण्याची संधी आहे. राजस्थान रॉयल्सला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने जबरदस्त फायदा झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 5 गडी गमवून 171 धावा केल्या. विजयासाठी 172 धावांचं आव्हान राजस्थानला दिलं होतं. मात्र राजस्थानचा संघ सर्वबाद 59 धावाच करू शकला. राजस्थानचा 112 धावांनी पराभव झाला. त्यामुळे नेट रनरेटमध्ये बंगळुरुला जबरदस्त फायदा झाला आहे. आता पाचव्या स्थानी असून दुसऱ्या स्थानी झेप घेऊ शकतो. कसं ते जाणून घ्या.
आरसीबी संघ 12 गुण आणि +0.166 रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे. आता दोन सामने खेळायचे आहेत. म्हणजेच दोन्ही सामने जिंकले तर 16 गुण होतील. टॉप फोरमधील संघाने एक जरी सामना गमावला तर आरसीबीला संधी आहे. आरसीबीचे पुढचे दोन सामने हैदराबाद आणि गुजरातसोबत आहे. 18 मे रोजी हैदराबाद सनराईजर्स आणि 21 मे रोजी गुजरात टायटन्ससोबत सामना आहे.
बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.