मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील गुणतालिकेचं गणित किचकट झालं आहे. कालपर्यंत ज्या संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची हमी होती. त्याच संघांना आता प्लेऑफमधून बाद होण्याची दाट भीती आहे. यात राजस्थान रॉयल्सचं असं काहीसं आहे. गुणतालिकेत टॉपवर असलेल्या गुजरात टायटन्सची धाकधूक देखील वाढली आहे. गुजरात टायटन्सला आणखी दोन सामने खेळायचे आहेत. त्यापैकी एका सामन्यात काहीही करून विजय मिळवणं आवश्यक आहे. अन्यथा नेट रनरेट खूपच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. गुणतालिकेत दिल्ली संघ सोडला तर सर्वच संघ प्लेऑपच्या शर्यतीत आहेत. चला जाणून घेऊयात गणित..
गुजरात टायटन्स 16 गुणांसह टॉपला आहे. पण प्लेऑफचं गणित काही सुटलेलं नाही. दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर स्थान निश्चित होईल. पण दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर मात्र नेटरनरेट महत्त्वाची भूमिका बजावेल. गुजरातचे पुढचे दोन सामने हैदराबाद आणि आरसीबी विरुद्ध आहेत.
चेन्नई सुपर किंग्स 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतील फक्त एक सामना उरला आहे. शेवचटचा सामना दिल्ली कॅपिटल्स सोबत असून या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला तर मात्र प्लेऑफची शर्यत कठीण होईल. त्यामुळे विजय मिळवणं आवश्यक आहे.
मुंबई इंडियन्स 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून दोन सामने उरले आहेत. दोन्ही सामने जिंकणं महत्त्वाचं आहेत. एक सामना गमावला तर नेट रनरेट महत्त्वाची भूमिका बजावेल. पण मुंबईचा नेट रनरेट हवा तसा चांगला नाही. नेट रनरेट -0.117 इतका आहे. त्यामुळे दोन्ही सामने जिंकणं महत्त्वाचं आहे. मुंबईचा पुढचा सामना लखनऊ आणि हैदराबादसोबत आहेत.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
लखनऊ सुपर जायंट्स 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने एका गुणांचा फायदा झाला खरा, पण दोन्ही सामने जिंकणं तितकंच महत्त्वाचं आहे. एक सामना गमावलं तर गणित नेट रनरेटवर येईल. लखनऊचा पुढचा सामना मुंबई आणि कोलकात्यासोबत आहे.
आरसीबी संघ 12 गुण आणि +0.166 रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे. आता दोन सामने खेळायचे आहेत. म्हणजेच दोन्ही सामने जिंकले तर 16 गुण होतील. टॉप फोरमधील संघाने एक जरी सामना गमावला तर आरसीबीला संधी आहे. आरसीबीचे पुढचे दोन सामने हैदराबाद आणि गुजरातसोबत आहे.
राजस्थानचा संघ 12 गुण आणि +0.140 रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. राजस्थानचा आता फक्त एकच सामना उरला आहे. हा सामना म्हणजे करो या मरोची लढाई आहे. पंजाब किंग्ससोबत शेवटचा सामना आहे. हा सामना काहीही करून मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.
कोलकात्याचा संघही 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. -0.256 रनरेट असल्याने सामना जिंकावा तर लागेल. पण टॉपमधील संघांच्या पराभवावर गणित अवलंबून असणार आहे. कोलकात्याचा एक एकमेव सामना लखनऊसोबत आहे.
पंजाबचा संघही 12 गुण आणि -0.268 रनरेटसह आठव्या स्थानी आहे. पंजाबचा प्लस पॉईंट म्हणजे दोन सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. टॉपमध्ये असलेल्या सात संघांचा पराभवाचं गणितही लागू होणार आहे. पंजाबचा पुढील सामना दिल्ली आणि राजस्थानसोबत आहे.
हैदराबादचा संघ 8 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तीन सामने उरले आहेत. हे तिन्ही सामने जिंकले तरी जर तरच गणित अवलंबून असणार आहे. एक सामना गमावला की आव्हान संपुष्टात येणार आहे. हैदराबादचे पुढील सामने गुजरात, बंगळुरु आणि मुंबई इंडियन्ससोबत आहे.