GT vs CSK IPL 2023 Qualifier 1 | गुजरात-चेन्नईला फायनलसाठी 2 संधी, पहिल्या झटक्यात पोहचण्यासाठी रस्सीखेच

| Updated on: May 23, 2023 | 12:06 AM

गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानात सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचण्यासाठी उतरणार आहे. त्याआधी या दोन्ही टीमची प्लेऑफमध्ये कामगिरी कशी आहे बघा.

GT vs CSK IPL 2023 Qualifier 1 | गुजरात-चेन्नईला फायनलसाठी 2 संधी, पहिल्या झटक्यात पोहचण्यासाठी रस्सीखेच
Follow us on

तामिळनाडू | चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ मंगळवारी 23 मे रोजी प्लेऑफमधील क्वालिफायर 1 या सामन्यात भिडणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांचा फायनलमध्ये पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. विशेष बाब म्हणजे या सामन्यात पराभूत होऊनही फायनलमध्ये पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. मात्र त्यापेक्षा पहिल्याच झटक्यात विजय मिळवून फायनलमध्ये धडक देण्याचा प्रयत्न चेन्नई आणि गुजरातचा असणार आहे. पण कोणत्या तरी एकाच टीमचा विजय होईल. मात्र तरीही क्रिकेट चाहत्यांना फूल पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल, यात काही शंका नाही.

चेन्नई दुसरी यशस्वी टीम

चेन्नई आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सनंतरची सर्वात यशस्वी टीम आहे. चेन्नईने याआधी आयपीएलच्या 13 मोसमांपैकी 11 वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. चेन्नई या 11 पैकी 9 वेळा अंतिम सामन्यात पोहचली. या 9 पैकी 4 वेळा चेन्नईने ट्रॉफी जिंकली. तर 5 वेळा उपविजेता म्हणून समाधना मानावं लागलं. बीसीसीआयकडून 2 वर्ष बंदी घातल्याने चेन्नईला सहभागी होता आलं नव्हतं.

तर चेन्नईची यंदा आयपीएल इतिहासात प्लेऑफमध्ये पोहचण्याची 12 वी वेळ ठरलीय. त्यामुळे चेन्नईने गुजरातला पराभूत केलं, तर चेन्नईची ही आयपीएल इतिहासात फायनलमध्ये पोहचण्याची 10 वी वेळ ठरेल, जो की एक रेकॉर्ड ठरेल.

चेन्नईची प्लेऑफमधील कामगिरी

चेन्नईने प्लेऑफमध्ये 24 पैकी 15 सामन्यात विजय मिळवलाय. या 15 विजयांमध्ये 4 अंतिम सामन्यात मिळवलेल्या विजयांचा समावेश आहे. तर उर्वरित 9 सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागलाय. यामध्ये चेन्नईला आयपीएल ट्रॉफीने 5 वेळा हुलकावणी दिलीय. थोडक्यात सांगायचं तर चेन्नई फायनलमध्ये 5 वेळा पराभूत झालीय.

गुजरातची प्लेऑफमधील कामगिरी

गुजरातने यंदा सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये धडक दिलीय. या गतविजेच्या गुजरातने प्लेऑफमधील दोन्ही सामने जिंकले आहेत. आता गुजरात सलग दुसऱ्या प्रयत्नात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचते की क्वालिफायर 2 खेळून तिसऱ्या प्रयत्नात अंतिम फेरीत धडकते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.