मुंबई | आयपीएल 16 व्या सिजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने या मोसमात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. विराटने खेळलेल्या 3 सामन्यात 2 अर्धशतकं ठोकली आहेत. विराटने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये 82, केकेआर विरुद्ध 21 आणि लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 61 धावांची खेळी केली. आरसीबीला सोमवारी 10 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 1 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीला 212 धावा करुनही पराभव झाला. त्यामुळे संपूर्ण टीमला हा पराभव जिव्हारी लागला.
दरम्यान विराटने आता त्याची लेक वामिका कोहली हिच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. बाप लेकीचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. विराट या फोटोत लेकीसोबत स्विम सूटमध्ये पूलवर बसलेला आहे. या फोटोत वामिका अगदी शांतपणे बसलेली दिसून येत आहे. विराट आणि वामिका या दोघांचा पाठमोरा फोटो आहे. विराटने या फोटोला कॅप्शन दिली नाही. मात्र हार्ट इमोजी शेअर केला आहे.
— Virat Kohli (@imVkohli) April 11, 2023
विराटने याआधी आपल्या लेकीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मात्र विराट अनुष्खा या दोघांनी आतापर्यंत आपल्या लेकीच्या चेहरा दाखवलेला नाही. वामिकासोबतच्या प्रत्येक फोटोत विराटने लेकीचा चेहरा कधीच दाखवलेला नाही. विराटने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत 2017 मध्ये इटलीत विवाह केला. त्यानंतर 2021 मध्ये विराट-अनुष्काला वामिकाच्या रुपात कन्यारत्न प्राप्त झालं.
दरम्यान आरसीबीने या मोसमात आतापर्यंत खेळळेल्या 3 पैकी 1 सामन्यातच विजय मिळवला आहे. आरसीबीने आपल्या सलामीच्या सामन्यात 5 वेळा चॅम्पियन असेलल्या मुंबई इंडियन्सवर 8 विकेट्सने विजय मिळवला. मात्र त्यानंतर आरसीबीला सलग 2 सामन्यात पराभव झाला. दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीवर 81 धावांनी मोठा विजय मिळवला.
शार्दुल ठाकूर याने निर्णायक क्षणी अर्धशतकी खेळी करत केकेआरचा डाव सावरला. शार्दुल ठाकूरही ही खेळी निर्णायक ठरली. तर त्यानंतर फिरकी जोडीने आरसीबीला झटपट आऊट करत गुंडाळलं होतं. तर तिसऱ्या सामन्यात लखनऊला 213 धावांचं आव्हान देऊनही आरसीबीला 1 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता. तर आरसीबी आपला पुढील सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 15 एप्रिल रोजी खेळणार आहे.