Virat and Anushka Dance | विराट कोहली याला अनुष्का शर्मा सोबत डान्स महागात, व्हीडीओत शेवटी काय झालं पहा

| Updated on: Apr 24, 2023 | 7:39 PM

Virat Kohli Dance With Anushka Sharma | अनुष्का शर्मा हीने पती आणि टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली याच्यासोबतचा डान्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Virat and Anushka Dance | विराट कोहली याला अनुष्का शर्मा सोबत डान्स महागात, व्हीडीओत शेवटी काय झालं पहा
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 वा मोसम सध्या सुरु आहे. या मोसमात विराट कोहली याला आरसीबीचं कर्णधारपद सोडल्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा नेतृत्वाची संधी मिळाली. विराटला या हंगामात आतापर्यंत एकूण 2 सामन्यात कॅप्टन्सी संधी केली. विराटने या दोन्ही मॅचमध्ये आरसीबीला विजय मिळून दिला. रविवारी 23 एप्रिलला आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. या मॅचमध्ये विराटला भोपळा फोडता आला नाही. मात्र त्याने संघाला जिंकवलं. विराटचं डान्स प्रेम हे क्रिकेट चाहत्यांना माहितीय. विराट शक्य तेव्हा मैदानातही डान्स करत असतो. विराटचा असाच एक डान्सचा व्हीडिओ व्हायरल झालाय. विराट याचा पत्नी आणि अभिनेत्री अनु्ष्का शर्मा हीच्यासोबतचा डान्स व्हीडिओ व्हायरल झालाय.

अनुष्काने या डान्सचा व्हीडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. डान्स पे चान्स असं कॅप्शन दिलंय. विराटला अनु्ष्कासोबत डान्स करणं महागात पडलंय. विराटला डान्स करताना इतक्या वेदना झाल्या की त्याला ते सहन झालं नाही.

विराट अनुष्कासोबत गुडघा मोडून नाचत होता. इथेच माशी शिकली. विराटला दुखावल्याने तो थेट फ्रेममधून बाहेर पडला. तसेच विराटची झालेली अवस्था पाहून अनुष्काला हसू आवरलं नाही. तर दुसऱ्या बाजूला विराटच्या चाहत्यांना धक्का बसला. विराटला गुडघा मोडून डान्स करण्याचं धाडस अंगलट आल्याचंही क्रिकेट चाहते म्हणत आहेत.

विराट अनुष्का डान्स व्हीडिओ

विराटला चाहत्यांचा सल्ला

विराटच्या या डान्स व्हीडिओनंतर चाहत्यांनी थेट सल्लाच दिला आहे. विराटला झालेल्या तीव्र वेदनेमुळे चाहते धास्तावले आहेत. अनुष्का, विराटला असले व्हीडिओ तयार करण्यासाठी प्रवृत्त करु नको, अजून आयपीएल बाकी आहे. तसेच त्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना खेळायचा आहे, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

दरम्यान विराट कोहली याला आशिया कप 2022 पासून सुर गवसला आहे. विराटने आयपीएल 16 व्या हंगामात आतापर्यंत आरसीबीकडून खेळलेल्या 7 पैकी 4 सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे. विराटने एकूण 7 मॅचमध्ये 46.50 सरासरीने 279 धावा केल्या आहेत. विराटचा स्ट्राईक रेटही 140 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता या डान्समुळे झालेली वेदना विराटला महागात पडते का, याकडे क्रिकेट चाहते लक्ष ठेवून असणार आहे.