IPL 2023 : RCB संघासाठी वाईट बातमी, विराट आणि डु प्लेसिसला ज्याची भीती तेच झालं!

| Updated on: Apr 04, 2023 | 6:09 PM

आरसीबी संघासह त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. त्यामुळे विराट कोहली आणि फाप डु प्लसिस यांचं टेन्शन वाढलं आहे.

IPL 2023 : RCB संघासाठी वाईट बातमी, विराट आणि डु प्लेसिसला ज्याची भीती तेच झालं!
Follow us on

मुंबई : आयपीएलमध्ये यंदाच्या पर्वाची झकास सुरूवात करत विजेतेपद जिंकण्याच्याच इराद्याने मैदानात उतरलेल्या आरसीबी संघाच्या अडचणची वाढल्या आहेत. पाचवेळा आयपीएलची विजेतेपदाची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडिअन्स संघाचा पराभव करत आरसीबीने विजयाचं खातं उघडलं आहे. मात्र आरसीबी संघासह त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. त्यामुळे विराट कोहली आणि फाप डु प्लसिस यांचं टेन्शन वाढलं आहे. आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू दुखापतीमुळे पूर्ण सीझनमधून बाहेर झाला आहे.

आरसीबीच्या या खेळाडूच्या टाचेला दुखापत झाली आहे. संघ व्यवस्थापनाला आशा होती की तो लवकरच माघारी परतेल मात्र तसं काही झालं नाही. बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अॅकडमीमध्ये तो आपल्या दुखातीवर काम करत आहे. त्यामुळे पहिल्या हापमध्यो तो काही संघाचा भाग असणार नाही हे स्पष्ट होतं. मात्र आता तो संपूर्ण सीझनमधूनच बाहेर झाल्याची माहिती बंगळुरूने ट्विट करत दिली आहे. यंदाच्या मोसमामध्ये प्रत्येक संघातील खेळाडूंमागे दुखापतींचं ग्रहण लागल्याचं दिसत आहे.

 

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणू नसून रजत पाटीदार आहे. गेल्या सीझनमध्ये 7 मॅचमध्ये 333 धाव करत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी त्याला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं होतं. या संधीचा त्याने फायदा घेत संघात आपलं एक वेगलं स्थान निर्माण केलं आहे. प्लेऑफ सामन्यामध्ये झळकवलेल्या शतकामुळे पाटीदार सर्वांच्याच लक्षात राहिलाय. इतकंच नाहीतर प्ले
ऑफ सामन्यामध्ये सर्वात कमी बॉलमध्ये शतक झळकवणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.

आरसीबीने मुंबई इंडिअन्स संघाचा पहिल्या सामन्यामध्ये 8 विकेट्सने पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने नाबाद 82 धावा तर कर्णधार फाप डु प्लेसिसने 73 धावा करत संघाच्या विजयामध्यो मोलाची भूमिका पार पाडली होती.