बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सामना सुरू असून सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 226 धावांचा डोंगर उभा केलाय. या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात एकदम खराब झाली. स्टार खेळाडू विराट एकदम खराबप्रकारे आऊट झाला. विराट कोहली आला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आकाश सिंहला एक खणखणीत चौकार मारला. त्यानंतर पुढच्या बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो आऊट झाला.
पाहा व्हिडीओ-
Bad Luck King #Kohli #RCBvCSK pic.twitter.com/sUdAJw0gVW
— Lokesh Kuruba (@KurubaraHuduga) April 17, 2023
विराट कोहली याच्यानंतर आरसीबीने दुसरी विकेट गमावली. महिपाल लोमरुर याला भोपळाही फोडता आला नाही. आरसीबीची 227 धावांचा पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली.
ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे जोडी मैदानात उतरली. पण ऋतुराज गायकवाड काही खास करू शकला नाही. 3 धावांवर असताना मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रहाणे आणि कॉनवे जोडीनं डाव सावरला. चौकार षटकारांची आतषबाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात वानिंदू हसरंगाला यश आलं.
अजिंक्य रहाणेचा त्याने त्रिफळा उडवला. 20 चेंडूत 37 धावा करून अजिंक्य रहाणे बाद झाला. यात 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे कॉनवेनं आपली आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याने या स्पर्धेतील आपलं दुसरं अर्धशतक झळकावलं. तसेच शिवम दुबेची त्याला चांगली साथ मिळाली. दोघांनी चौकार षटकारांची आतषबाजी केली.
कॉनवेला बाद करण्यात हर्षल पटेलला यश मिळालं. कॉनवे 83 धावांवर असताना त्याला क्लिन बोल्ड केलं. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार ठोकले. शिवम दुबेनं बंगळुरुविरुद्ध वादळी खेळी सुरुच ठेवली. 27 चेंडूत 52 धावांची खेळी केली
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, वेन पारनेल, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज.