बंगळुरु | शुबमन गिल या युवा सलामी फलंदाजाच्या नाबाद शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्स टीमने रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीने विराट कोहली याच्या शतकाच्या जोरावर गुजरातला विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र गुजरातने शुबमन गिल याच्या नाबाद शतकाच्या जोरावर सामना जिंकला. आरसीबीच्या या पराभवामुळे साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यातच प्लेऑफचं स्वप्न भंगलं. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी विजय आवश्यक होता. मात्र गुजरातने आरसीबीला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभूत केलं.
आरसीबीच्या या पराभवामुळे आणि गुजरातच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सला लॉटरी लागली आहे. मुंबईची गुजरातच्या विजयामुळे प्लेऑफमध्ये एन्ट्री झाली आहे. मुंबई प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली आहे. मुंबईच्या आधी गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या 3 संघांनी प्लेऑफसाठी प्रवेश मिळवला होता. त्यामुळे रविवारी 21 मे रोजी मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांमध्ये 1 जागेसाठी चुरस होती. या एका जागेसाठी मुंबई आणि आणि आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकणं बंधनकारक होतं.
मुंबईने 21 मे रोजीच्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला. यासह मुंबईने आपल्या प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या. त्यानंतर आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्याच्या निकालावर प्लेऑफची चौथी टीम ठरणार होती. आरसीबीने हा सामना जिंकला असता तर आरसीबी चौथी ठरली असती. मात्र गुजरातच्या विजयाने मुंबईला प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळाली.
मुंबईची प्लेऑफमध्ये धडक
Superheroes. Magicians. Monsters. You call them Avengers, we call them Mumbai Indians. ?♂️
Playoffs, here we come. ?#OneFamily #MIvSRH #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/478KvXswYC
— Mumbai Indians (@mipaltan) May 21, 2023
मुंबईची एन्ट्री झाल्याने पलटण चाहत्यांकडून मुंबईतील रस्त्यावर आणि गल्लोगलीत फटाके फोडून जल्लोष केला जात आहे. मुंबई समर्थकांच्या या जल्लोषाचे व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Mumbai Indians boys are celebrating ?❤️
So happy pic.twitter.com/ecGrM4bNkj— Asha (@ashaa_45) May 21, 2023
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज आणि विजयकुमार वैशाख.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि यश दयाल.