IPL 2023 | रिंकू सिंह याने विराट कोहली याच्यासोबत नक्की काय केलं? व्हीडिओ व्हायरल

| Updated on: Apr 27, 2023 | 8:29 PM

केकेआरने बुधवारी आरसीबीवर 21 धावांनी विजय मिळवला. केकेआरने आरसीबीवर या मोसमात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. या सामन्यानंतर एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

IPL 2023 | रिंकू सिंह याने विराट कोहली याच्यासोबत नक्की काय केलं? व्हीडिओ व्हायरल
Follow us on

बंगळुरु | क्रिकेट लेजेंड्स गेम म्हटलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या वाक्याला छेद देणाऱ्या अनेक घटना या सामन्यादरम्यान घडल्या आहेत, ज्यामुळे कालिमा फासली गेली आहे. लाईव्ह सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अंगावर धावून जाणं, सर्रासपणे शिव्या देणं, हमरीतुमरी करणं असे सर्व प्रकार घडताना आपण पाहिले आहेत. अशा सर्व घटनांमध्ये एका खेळाडूकडून दुसऱ्याला सन्मान देणं असे क्षण क्वचितच पाहायला मिळतात. असाच क्षण क्रिकेट चाहत्यांना अनुभवयाला मिळाला. आयपीएल 16 व्या हंगामातील 36 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. केकेआरने या सामन्यात आरसीबीचा घरच्या मैदानात 21 धावांनी पराभव केला. केकेआरच्या या विजयानंतर मैदानातील ती एक कृती चर्चेचा विषय ठरली.

नक्की काय झालं?

काही दिवसांपूर्वी आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यानंतर विराट कोहली याने दिल्लीचा क्रिकेट डायरेक्टर सौरव गांगुली याच्यासोबत हस्तांदोलन करणं टाळलं. मात्र क्रिकेट चाहत्यांना बुधवारी 26 एप्रिलला या उलट चित्र पाहायला मिळालं. सामना संपल्यानंतर आरसीबी आणि केकेआरचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ हस्तांदोलन करत होते. या दरम्यान रिंकू सिंह याने विराट कोहली याचे पाया पडला. रिंकूची ही कृती सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.
त्यांनतर विराटनेही मनं जिंकलं. विराटनेही रिंकूला घट्ट मिठी मारली. या दोघांचा या कृतीचा व्हीडिओ हिट झालाय.

रिंकू सिंह हा 16 व्या मोसमाचा हिरो ठरलाय. रिंकून गुजरात जायंट्स विरुद्धच्या सामन्यात टीमला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 31 धावांची गरज असताना 5 सिक्स ठोकले होते. रिंकूने केकेआरला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. रिंकून केकेआरला सामना एकहाती जिंकून दिला होता. रिंकूनं आतापर्यंत या मोसमातील 8 सामन्यात 18 सिक्स ठोकले आहेत. रिंकू या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

रिंकू सिंह याच्याकडून विराट कोहलीचं पदस्पर्श

रिंकूने आरसीबी विरुद्धच्या या सामन्यातही धमाका केला. रिंकून मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर 18 व्या ओव्हरमध्ये सलग 3 चेंडूमध्ये 6,4,4 ठोकेले. रिंकूने या सामन्यात 10 बॉलमध्ये 18 धावा केल्या.

सामन्याचा धावता आढावा

आरसीबीने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून राउंड फिगर 200 धावा केल्या, ज्यामुळे आरसीबीला 201 धावांचं आव्हान मिळालं. मात्र आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 179 धावाच करता आल्या.