बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमात क्रिकेट चाहत्यांना सलग 2 दिवस 2 रंगतदार आणि पैसा वसूल सामने पाहायला मिळाले. रविवारी केकेआरच्या रिंकू सिंह याने शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 5 सिक्स ठोकून गुजरातवर सनसनाटी विजय मिळवला. तर सोमवारी 10 एप्रिलला लखनऊने आरसीबीला त्यांच्यात घरात 1 विकेटने पराभूत केलं. आरसीबीने विजयासाठी दिलेलं 213 धावांचं आव्हान लखनऊने शेवटच्या बॉलवर सिंगल काढून पूर्ण केलं. आता इतका सनसनाटी आणि बल्ड प्रेशर वाढवणारा सामना जिंकल्यानंतर विजयी जल्लोष तर होणारच. आवेश खान याने शेवटच्या बॉलवर चोरटी धाव पूर्ण केली. त्यानंतर लखनऊच्या डगआऊटमध्ये बसलेले खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ वेगात मैदानात धावत आले.
लखनऊचा हा या मोसमातील 4 सामन्यांपैकी तिसरा विजय ठरला. लखनऊच्या या विजयानंतर कोचिंग टीममधील गौतम गंभीर याचा जल्लोष पाहण्यासारखा होता, त्याचं कारणही तसंच होतं. लखनऊने विराट कोहली याच्या टीमचा पराभव केला होता. काही मोसमांआधी विराट-गंभीर सामन्यादरम्यान भिडले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये असेलले जीवाभावाचे संबंध आपल्या सर्वांना माहिती आहे.
गौतम गंभीरचा व्हायरल व्हीडिओ
Gautam Gambhir to RCB Fans !! ?
— Tanay Vasu (@tanayvasu) April 10, 2023
आरसीबीला त्यांच्या घरात पराभूत केल्याने कायम गंभीर असेलला गौतम आनंदी झाला होता. गंभीरने सामन्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांना गप्प बसा असं इशाऱ्याद्वारे म्हटलं. इतकंच नाही, तर यापुढे जाऊन गंभीरने चाहत्यांना शिवीगाळ आणि अपशब्द वापरल्याचाही दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
दरम्यान सामन्यानंतर विराट आणि गौतम गंभीर या दोघांनीही हस्तांदोलन केलं. तसेच त्यानंतर विराट कोहली, गौतम गंभीर आणि विजय दहीया या दिल्लीकरांनी एकत्र फोटो काढला.
दिल दोस्ती दुनियादारी
Ye IPL hai mere yaar, bas ishq mohabbat pyaar ?❤️@GautamGambhir | @imVkohli | #RCBvLSG | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #LSG | #GazabAndaz pic.twitter.com/Kqnwbh5ICz
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2023
तसेच या वेळेस गंभीर आणि विराट या दोघांनी एकमेकांना कडकडून मिठीही मारली. त्यामुळे एकेकाळी मैदानात भिडलेले टीम इंडियाचे आजी माजी दिग्गज खेळाडूंना अशा प्रकारे पाहून चाहतेही सुखावले. लखनऊ सुपर जायंट्सकडून या तिकडीचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.