बंगळुरु | लखनऊ सुपर जायंट्सचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरन याने इतिहास रचला आहे. निकोलस याने निर्णायक क्षणी टीमला धावांची गरज असताना विजयी धावांचं पाठलाग करताना आयपीएलच्या 16 व्या मोसमातील सर्वात वेगवान आणि इतिहासातील दुसरं वेगवान अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. निकोलस पूरन याने अवघ्या 15 बॉलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध अर्धशतक ठोकलं आहे. निकोलस याने या खेळी दरम्यान गगनचुंबी षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला.
निकोलस पूरन याने चेन्नई सुपर किंग्सच्या अजिंक्य रहाणे याचा आयपीएलच्या 16 व्या मोसमातील वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड ब्रेक केला. रहाणेने मुंबई इंडियन्स विरुद्ध 19 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. तसेच पूरन हा आयपीएलच्या इतिहासात संयुक्तपणे दुसरं वेगवान अर्धशतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. निकोलसने 15 बॉलमध्ये अर्धशतक ठोकत यूसुफ पठाण याच्या अर्धशतकी विक्रमाची बरोबरी केली. यूसुफने 2014 मध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 15 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं.
तसेच आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी बॉलमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम हा केएल राहुल आणि पॅट कमिन्स या दोघांच्या नावावर आहे. केएल राहुल याने 2018 मध्ये दिल्ली कॅपिट्ल्स तर पॅट कमिन्स याने 2022 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. या दोघांनी संयुक्तपणे 14 बॉलमध्ये
याने आहे. निकोलस पूरन याने 19 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. निकोलसने यासह आयपीएलच्या 16 व्या मोसमात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला. या दोघांनीही 14 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.
निकोलस पूरन याची फटकेबाजी
Fastest FIFTY of the season now belongs to @nicholas_47 ?
He's playing a blinder of a knock here ??
What a turnaround this with the bat for @LucknowIPL ?
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/1oMIADixPh
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.