बंगळुरु | मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेतील गेल्या 10 वर्षातील परंपरा या वर्षातही कायम ठेवली आहे. मुंबईचा आयपीएलच्या 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 8 विकेट्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. या पराभवासह मुंबई इंडियन्सचं 2013 पासून प्रत्येक मोसमातील आपला पहिला सलामीचा सामना जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. मुंबईची पराभवाने सुरुवात झाल्याने मुंबईच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सला आणि मुंबईच्या चाहत्यांना विजयी सुरुवातीसाठी पुढील मोसमाची वाट पाहावी लागणार आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला 2013 पासून ते आतापर्यंत म्हणजेच 2023 पर्यंत प्रत्येक मोसमातील आपला सुरुवातीचा सामना जिंकता आलेला नाही. मुंबई इंडियन्सने 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विजय मिळवत विजयाने सुरुवात केली होती. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत मुंबईला विजयी सुरुवात करण्यात अपयश आलेलं आहे. मुंबईला सलग 11 मोसमांमध्ये पराभवाने सुरुवात करावी लागली आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीम आहे. मुंबईने 2013 पासून एकूण 5 वेळा रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ट्रॉफी जिंकली आहे. मात्र 2013 पासून एकदाही मोसमाची सुरुवात विजयाने करता आलेली नाही.
mumbai indians consecutively lost his opening match from ipl 2013 to 2022
2017 lost against RPS
2018 lost against csk
2019 lost against dc
2020 lost lost against csk
2021 lost against rcb
2022 lost against dc
2023 – ?#MI #MumbaiIndians #IPL2023 #Paltan #RohitSharma?— Sanjay Patil (@patil23697) April 2, 2023
प्रत्येक मोसमातील सुरुवात ही विजयाने व्हावी, अशी इच्छा प्रत्येक संघाची असते. मात्र मुंबईला गेल्या 10 वर्षात विजयी सलामी देता आलेली नाही. त्यामुळे मुंबई यंदा आरसीबीवर विजय मिळवत आपल्यावर लागलेला डाग पूसन काढेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र पलटणने ही नकोशी परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे आता मुंबईला हा डाग पुसून काढण्यासाठी आणि विजयी सुरुवात करण्यासाठी आणखी 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, एम ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, एच पटेल, आर टोपली, मोहम्मद सिराज, के शर्मा आणि ए दीप.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान.