IPL 2023, RCB vs MI | रोहित शर्मा याचा कारनामा, आरसीबी विरुद्ध ‘द्विशतक’

| Updated on: Apr 02, 2023 | 8:17 PM

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने आयपीएलच्या 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात अनोखं द्विशतक ठोकलंय. रोहित असा कारनामा करणारा तिसरा कर्णधार ठरला आहे.

IPL 2023, RCB vs MI | रोहित शर्मा याचा कारनामा, आरसीबी विरुद्ध द्विशतक
Follow us on

बंगळुरु | आयपीएल 2023 च्या मोसमातील 5 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडतोय. आरसीबीचा कॅप्टन फॅफ डु प्लेसिसने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला या सामन्यात विशेष काही करता आलं नाही. रोहित अवघी 1 धाव करुन आऊट झाला. मात्र त्यानंतरही रोहितने कीर्तीमान केला आहे. रोहित
टॉससाठी मैदानात येताच मोठा रेकॉर्ड केला आहे. रोहितने अनोखं द्विशतक ठोकलंय. रोहित अशी कामगिरी करणारा एकूण तिसरा आणि महेंद्रसिंह धोनी याच्यानंतरचा दुसरा कर्णधार ठरला आहे.

नक्की रेकॉर्ड काय?

हिटमॅन रोहित शर्मा याचा कर्णधार म्हणून टी 20 क्रिकेटमधील हा 200 वा सामना आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय असे एकूण मिळून हे 200 सामने आहेत. रोहितने कर्णधार म्हणून टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्साठी 200 पूर्ण केले आहेत. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात आतापर्यंत 200 पैकी टीमला 124 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. रोहितची कर्णधार म्हणून विजयी सरासरी ही 63 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

रोहितच्या आधी आतापर्यंत एकूण 2 दिग्गजांनीच 200 सामन्यांमध्ये विविध संघांकडून कर्णधारपदाची भूमिका पार पाडलीय. यामध्ये महेंद्रसिंह धोनी आणि डॅरेन सॅमी याचा समावेश आहे. सर्वाधिक टी सामन्यांमध्ये कॅपटन्सी करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर आहे. धोनीने आतापर्यंत एकूण 307 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स, रायसिंग पुणे सुपर जायंट्स आणि टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. धोनीने 307 पैकी 179 सामन्यांमध्ये आपल्या टीमला विजयी केलंय.

रोहित शर्मा याचं द्विशतक

तसेच डॅरेन सॅमी याने 208 मॅचेसमध्ये विंडिजसह विविध लीगमध्ये अनेक संघांचं नेतृत्व केलंय. डॅरेनने आपल्या नेतृत्वात 208 पैकी 104 मॅचमध्ये टीमला विजयी केलंय.

यशस्वी कर्णधार आणि टीम

रोहित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी 2013 पासून कर्णधारपद सांभाळतोय. रोहितने 2013 पासून मुंबईला एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकून दिली आहे. रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील यशस्वी कर्णधार आणि टीम आहे.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, एम ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, एच पटेल, आर टोपली, मोहम्मद सिराज, के शर्मा आणि ए दीप.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान.