मुंबई : भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा यंदाच्या पर्वातील पहिला सामना होता. मुंबईला आरसीबीच्या गोलंदाजांनी 173 धावांवर रोखलं होतं. तिलक वर्मा या युवा खेळाडूने आरसीबीच्या बॉलिंग लाईन अप फोडून काढला होता. एकट्या तिलकनेच 84 धावा करत मुंबईला एक सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली होती. मुंबईने कित्येक कमी धावसंख्या करून सामने जिंकले आहेत हे सर्वांना माहितच आहे. त्यात आज मुंबईकडे एक हुकमी एक्का होता तो म्हणजे जोफ्रा आर्चर.
मागील सीझनमध्ये जोफ्रा दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता, पहिली मॅचही खेळणार की नाही याबाबत काही फिक्स नव्हतं. जोफ्रा अंतिम अकरामध्ये होता त्यामुळे सर्व क्रिकेट रसिकांना जोफ्रा वि. कोहलीला मैदानात पाहायचं होतं. जोफ्राने जबरदस्त सुरूवात केली होती. विराटचा कॅच सुटला त्यानंतर विराट जो काही सुटला त्यानंतर त्याने काही थांबायचं नाव घेतलं नाही. विराटने नाबाद 82 धावांची खेळी करत सिक्सर मारत संघाला विजय मिळवून दिला.
Virat Kohli vs Jofra Archer today, the Best vs Best! ?pic.twitter.com/oowX6Ub4Gq
— S. (@Sobuujj) April 2, 2023
विराटने ज्या ओव्हरमध्ये कॅच सुटला त्याच ओव्हरमध्ये एक क्लास चौकार आणि पुढे येत एक सिक्स मारला. त्यानंतर परत पॉवर प्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्येही विराटने जोफ्राला चौकार मारला. त्यानंतर 14 व्या ओव्हरमध्येही एक कडक सिक्स किंग कोहलीने आर्चरला मारला. पाहायला गेलं तर दिवसच विराटचा होता. विराटचे दोन कॅचही ड्रॉप झाले होते त्यानंकर विराट वेगळ्याच मुडमध्ये दिसला. मुंबईच्या एकाही बॉलरला फॅफ आणि विराटने सोडलं नाही. बेस्ट वि. बेस्ट मध्ये विराटने खऱ्या अर्थाने बाजी मारली.
दरम्यान, आरसीबीने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. बॅटींगला आलेल्या मुंबई संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 8 विकेट्स आणि 22 बॉल राखून विजय मिळवला आहे. तर मुंबईने आपला गेल्या 11 वर्षापासूनचा रेकॉर्ड कायम ठेवला तो म्हणजे पहिला सामना गमवायचा.