RCB vs PBKS IPL 2023 | पंजाबवर बंगळुरूचा 24 धावांनी विजय, गुणतालिका पाहता पाच संघात चुरस वाढली

| Updated on: Apr 20, 2023 | 7:55 PM

RCB vs PBKS IPL 2023 | विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाबवर दणदणीत विजय मिळवला. 24 धावांनी विजय मिळवत पाचव्या स्थानावर झेप घेतली. या विजयामुळे आयपीएल स्पर्धेतील चुरस वा

RCB vs PBKS IPL 2023 | पंजाबवर बंगळुरूचा 24 धावांनी विजय, गुणतालिका पाहता पाच संघात चुरस वाढली
RCB vs PBKS IPL 2023 | आरसीबीने पंजाबव विजय मिळवल्यानंतर जर तरच गणित, पाच संघामध्ये चढाओढ
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

मुंबई : आयपीएल स्पर्धा 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ सोडला तर सर्वच संघ स्पर्धेत आहेत. त्यामुळे प्रत्येक विजय आणि पराभव महत्त्वाचा ठरत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर 24 धावांनी विजय मिळवला. यामुळे आता पाच संघाचे एकसारखे गुण झाले आहेत. तर पंजाबला नेट रनरेटमुळे जबरदस्त फटका बसला आहे. पाच संघाचे गुण सारखे असले तरी नेट रनरेटमध्ये फरक आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स या संघांचा समावेश आहे.

राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स 8 गुणांसह टॉप दोनमध्ये आहेत. तर केकेआर आणि हैदराबाद 4 गुणांसह तळाशी आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 गडी गमवून 20 षटकात 174 धावा केल्या. विजयासाठी 175 धावांचं आव्हान पंजाब किंग्स समोर होतं. पण पंजाबचा संघ 18.2 षटकात सर्वबाद 150 धावा करू शकला. मोहम्मद सिराजने या सामन्यात जबरदस्त स्पेल टाकला. 4 षटकात 21 धावा देत 4 गडी बाद केले. तर वनिंदु हसरंगाने 2, तर पार्नेल आणि हर्षल पटेलनं प्रत्येकी एक गडी बाद केला.

पंजाबचा डाव

बंगळुरुने दिलेल्या विजयी धावांचा पाठलाग करताना पंजाबचा डाव सुरुवातीलाच अडखळला. आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. अथर्व तायडेच्या रुपाने पहिला धक्का बसला. अवघ्या 4 धावांवर असताना मोहम्मद सिराजने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या मॅट शॉर्टला वनिंदू हसरंगाने त्रिफळाचीत केलं. तो 8 या धावसंख्येवर असताना बाद झाला. त्यानंतर लायम लिविंगस्टोनही काही खास करू शकला नाही. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर 2 धावा असताना बाद झाला. त्यानंतर हरमनप्रीत भाटीया धावचीत झाला. त्यामुळे संघावरील दडपण वाढलं.

सॅम करन आणि प्रभसिमरन जोडी बाद झाल्यानंतर सामना हातातून निसटला. शाहरुख खान काही करेल असं वाटत असताना यष्टीचीत झाला आणि बंगळुरुने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. हरमीनप्रीत ब्रार आणि नाथन एलिस यांना एकाच षटकात मोहम्मद शमीने तंबूचा रस्ता दाखवला. तर दुसरीकडे जितेश शर्माची एकाकी झुंजही अपयशी ठरली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग