IPL 2023 : वडिलांना OUT झालेले पाहून ‘या’ क्रिकेटरच्या लेकीला नाही झालं सहन, भर मैदानात… Video व्हायरल!

| Updated on: Apr 24, 2023 | 7:07 PM

आरसीबी आणि आरआर यांच्याच झालेल्या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वडील आऊट झाल्यावर चिमुकलीच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

IPL 2023 : वडिलांना OUT झालेले पाहून या क्रिकेटरच्या लेकीला नाही झालं सहन, भर मैदानात... Video व्हायरल!
Virat kohli ipl 2023
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या 16 व्या हंगामामध्ये थरारक सामने होताना पाहायला मिळत आहे. एकाच ओव्हरमध्ये 29 धावांची गरज असतानाही रिंकू सिंग याने कोलकाताला सामना जिंकून दिला होता. सामन्यांमध्ये खेळाडूंचं कुटूंबातील सदस्य पाहायला मिळतात. यामध्ये त्यांची लहान मुलंही असतात. अशातच रविवारी झालेल्या आरसीबी आणि आरआर यांच्याच झालेल्या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वडील आऊट झाल्यावर चिमुकलीच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

कोण आहे खेळाडू?

आयपीएल 2023 च्या 32 सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये झाला. यामध्ये आरसीबीने 7 धावांनी राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला होता. राजस्थान संघाला 190 धावा करायच्या होत्या. मात्र त्यांची सुरूवात एकदम खराब झाली होती. देवदत्त पडिकल आणि यशस्वी जयस्वाल यांनी डाव सावरला होता. मात्र दोघे बाद झाल्यानंतर राजस्थान संघाची अवस्था खराब झाली होती.

 

 

संजू सॅमसनहीव बाद झाला, त्यानंतर आर अश्विन खेळायला त्याने काही मोठे फटके मारले आणि संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. राजस्थानला शेवटच्या षटकात विजयासाठी 20 धावांची गरज होती. अश्विनने तीन चेंडूंमध्ये 10 धावा केल्या आणि सामन्यात रंगत आणली. चौथ्या चेंडूवरही अश्विनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही आणि कॅच आऊट झाला. यावेळी स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेली अश्विनची मुलगी आपल्या वडिलांना बाहेर पाहून भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. वडिल मैदानातून बाहेर जात असताना मुलगी भावूक झालेली पाहायला मिळाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (C), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (W), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख