मुंबई | आयपीएल 16 व्या सिजनमध्ये आतापर्यंत प्रत्यके संघाने किमान 5 सामने खेळले आहेत. प्रत्येक संघाने किमान 1 सामना जिंकला आहे. अवघ्या 10 दिवसांनी 16 वा मोसम सुरु होऊन 1 महिना पूर्ण होईल. या मोसमात आतापर्यंत अनेक थरारक आणि रंगतदार सामने क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. आयपीएलने आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण उपलब्ध करुन दिलंय. क्रिकेट चाहत्यांना 9 एप्रिलला बीपी वाढवणारा सामना पाहायला मिळाला. गुजरात जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना पार पडला. केकेआरचा रिंकू सिंह याने टीमला अखेरच्या ओव्हरमध्ये सलग 5 सिक्स ठोकून विजय मिळवून दिला. तेव्हापासून आतापर्यंत अनेक काळजाचा ठोका चुकवणारे सामने क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत.
आयपीएल स्पर्धेत विविध देशांमधील युवा खेळाडू एकत्र येतात. त्यामुळे साहजिकच वर्षातून सर्वांचीच एकत्र भेट होते. या दरम्यान खेळाडू हे दुसऱ्याची आवर्जून विचारपूस करतात. तर आपल्या खास मित्रासोबत हक्काने मजा मस्ती करतात. मात्र मजा मस्ती करण्याची एक हद्द असते, असं म्हणतात. पण राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने सर्व मर्यादा तोडल्या आहेत. चहलने मस्ती मस्तीत मित्रासोबत नको ती मस्ती केली, ज्यामुळे त्या खेळाडू मित्राला दुखापत होण्याची शक्यता होती. यामुळे नेटकरीही चहलवर संतापले आहेत.
युजवेंद्र चहल याने दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉक याच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारण्याचा प्रयत्न केलाय. चहल क्विंटनच्या पाठीमागून त्याच्या दोन पायाच्या मधून लात मारण्याचा प्रयत्न करतो. राजस्थान रॉयल्स टीमने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हीडिओ ट्विट केला आहे. मात्र हा व्हीडिओ गमतीत करण्यात आला आहे. चहलने क्विंटनला खरीखुरी लाथ मारलेली नाही. चहलने मस्ती म्हणून हा सर्व प्रकार केला आहे. मात्र अशी मस्ती करायचीच कशाला, असा संतप्त प्रश्नही नेटकऱ्यांनी चहलच्या या कृतीनंतर उपस्थित केला आहे.
युजवेंद्र चहल याची मस्ती
?? no one like Yuzi bhai! pic.twitter.com/RXE8QytJSc
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 19, 2023
या सर्व प्रकरणानंतर हा व्हायरल व्हीडिओ केव्हाचा आहे, असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे. बुधवारी 19 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना पार पडला. या सामन्याआधीचा हा व्हीडिओ असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान युजवेंद्र खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्स टीम सध्या जोरात आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. या 6 पैकी 4 सामन्यात राजस्थानने विजय मिळवला आहे. विजय, पराभव, सलग 3 विजय आणि पराभव असा राजस्थान रॉयल्स टीमचा आतापर्यंतचा इथवरचा प्रवास राहिला आहे. राजस्थान रॉयल्स पॉइंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह अव्वल स्थानी विराजान आहे.
तर चहलने आतापर्यंत राजस्थानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. चहलने आतापर्यंत या मोसमातील 6 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. चहल पर्पल कॅपच्या शर्यतीत 11 विकेट्ससह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. राजस्थान रॉयल्सचा आगामी सामना हा आता 23 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळवण्यात येणार आहे.